वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरत धुमाकूळ घालणारा चोर जेरबंद, दहा दुचाकी जप्त
श्रीगोंदा दि.9 जानेवारी 2025
महेंद्र बाळू सुपेकर (रा.पुनर्वसन, काष्टी, ता. श्रीगोंदा) यास ताब्यात घेत श्रीगोंदा पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त केल्यांची माहिती पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली.
सोमवारी (दि.४) सकाळी श्रीगोंदा पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील काष्टी येथे गस्त घालीत विना’ क्रमांकाच्या दुचाकीवरून फिरणाऱ्या महेंद्र बाळू सुपेकर या संशयिताची चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली. त्याने पैशांची गरज असल्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.
काही दुचाकी खोटी कहाणी सांगून विकल्या आहेत, तर काही शेतात लपून ठेवल्याचे सांगितले. त्याच्याकडील दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सदर वेगवेगळया ठिकाणाहुन चोरी केलेल्या एकुण 10 मोटार सायकल असा एकुण 10,00,000/-रुपये किमंतीचा मुददेमाल हस्तगत केला असून आरोपी जेरबंद केला आहे. सदर मोटार सायकलच्या मालकाचा शोध घेण्याचे काम चालु असून यातील मोटार सायकल ज्यांच्या असतील त्याने श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. प्रशांत खैरे सो, अपर पोलीस अधिक्षक, व मा.श्री. विवेकानंद वाखारे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. किरण शिंदे सो, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांच्या पथकामधील पो.ना/गोकुळ इंगावले, पोकों/संदिप राऊत, पोकों/संदिप शिरसाठ, पोकॉ/अरुण पवार व कोर्ट ऑर्डली मपोकों/रुपाली मोटे यांच्या विशेष मदतीने व सदर गुन्हयाचे तपासात दक्षिण मोबाईल सेल नेमणुकीचे पोकॉ//राहुल गुंडु व पोकॉ/नितीन शिंदे यांची मदत मिळाली असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेको/आप्पासाहेब तरटे व पोकॉ/प्रविण गारुडकर हे करीत आहेत.