ताज्या बातम्याश्रीगोंद्याच्या 'संजय'आनंदकर स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी...

श्रीगोंद्याच्या ‘संजय’आनंदकर स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी…

spot_img
spot_img

लोकमत महागेम्स स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदकासह पटकावले विविध पदके

श्रीगोंदा :दि.11 फेब्रुवारी 2025

लोकमत कॅम्पस क्लब आयोजित महागेम्स 2025 पर्व 2 या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवशी चालणाऱ्या या क्रीडा उपक्रमात पाच हजारांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते.

हा भव्य दिव्य असा क्रीडा महोत्सव वाडिया पार्क अहिल्यानगर येथे पार पडला.

लहान वयातच मुलांना मैदानी खेळाचे महत्व कळाले पाहिजे शरीर तंदुरुस्त असेल तरच मन तंदुरुस्त राहील आणि मानसिक दृष्ट्या विकास होऊन विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करू शकतो. अशा स्पर्धेचे आयोजन नेहमी झाले पाहिजे आणि मुलांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होऊन क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. ‘लोकमतचा’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून विद्यार्थ्यांना लोकमतने एक प्रकारची परवणी उपलब्ध करून दिली असे आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

या संपूर्ण स्केटिंग स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास विविध गटातील ४००हुन अधिक विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील “संजय आनंदकर”स्पोर्ट अकॅडमीचे १५ स्पर्धक सहभागी झाले होते.त्यापैकी दोन सुवर्णपदक,पाच रोप्य, आणि एक कांस्यपदक पटकावलं.

यामध्ये रोनीत औटी व अमीर पठाण यांनी सुवर्णपदक जिंकली. रुद्र ढवळे, कैवल्य कोथिंबीरे, सोहम चाकणे, साई कसरे, मृणाल गिरमकर यांनी रोप्य पदक पटकावले. तर वेदश्री ढवळेने कांस्यपदक पटकावले. तसेच स्पंदन पाटील व राज औटी यांनी सेमी फायनल जिंकून फायनल पर्यंत मजल मारली मात्र ते पदकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तर पार्थ होले, रुद्र गंगाधरे, मयूर गुंदेचा, श्रेयस घुगे, यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेत चांगले प्रयत्न केले.

चौकट

आमच्या मुलांना प्रशिक्षण देणारे हेच त्यांचे खरे शिक्षक व पाल्य आहेत. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना पालकांनी संजय आनंदकर स्पोर्ट अकॅडमीचे प्रशिक्षक जयेश आनंदकर सर यांना श्रेय दिले असून त्यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले म्हणूनच मुलांनी हे यश संपादन केले अशी प्रतिक्रिया नगरीपंचशी बोलताना दिली.

या कामगिरीमुळे “संजय आनंदकर”स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे तालुका भर कौतुक होत आहे.

लेटेस्ट न्यूज़