ताज्या बातम्याखळबळजनक ! श्रीगोंद्यात शीर, हात नसलेला मृतदेह आढळला ?

खळबळजनक ! श्रीगोंद्यात शीर, हात नसलेला मृतदेह आढळला ?

spot_img
spot_img

खळबळजनक ! श्रीगोंद्यात शीर, हात नसलेला मृतदेह आढळला ?

श्रीगोंदा दि.१३ मार्च २०२५

दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील एका विहिरीत बुधवारी (दि. १२) रोजी एका अनोळखी वीस वर्षीय युवकाचा मृतदेह अढळला. मृतदेहाला शीर, दोन्ही हात, एक पाय नसल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मृतदेह ताब्यात घेतला आहे. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीगोंदा-शिरुर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी शिवारातील विहिरीत मृतदेह टाकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दाणेवाडी येथील विठ्ठल दगडु मांडगे यांच्या मालकीची ही विहीर आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. हा तरुण नेमका कोणत्या गावातील आहे, त्याची हत्या नेमकी कोणी, कोठे, व का केली, असावी या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

दरम्यान, दाणेवाडी येथील एक वीस वर्षीय युवक बेपत्ता असल्याची माहिती आहे. तो शिरुर येथील सीटी बोरा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. मात्र, या मृतदेहाला शीर नसल्याने ओळख पटलेली नाही.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारी घटनास्थळी दाखल झाले.

लेटेस्ट न्यूज़