ताज्या बातम्याविकास काम व जीर्णोद्धारासाठी आमचा विरोध नाही :आमीन शेख

विकास काम व जीर्णोद्धारासाठी आमचा विरोध नाही :आमीन शेख

spot_img
spot_img

विकास काम व जीर्णोद्धारासाठी आमचा विरोध नाही :आमीन शेख

श्रीगोंदा : दि.19 एप्रिल 2025

शेख महंमद बाबा देवस्थान जीर्णोद्धारास आमचा कधी विरोध नव्हता व नाही. माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून देवस्थान सुशोभीकरणही केले आहे. पेव्हिंग ब्लॉक, हायमॅक्स दिवे, अशी विविध कामे लोकवर्गणीसह ट्रस्टच्या माध्यमातून केली आहेत. मात्र, आमच्यावर विकास कामात अडथळा आणल्याचा खोटा आरोप केला जात आहे, अशी माहिती सुफी हजरत शेख महंमद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष व शेख महंमद बाबा यांचे वंशज आमीन शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

संत शेख महंमद महाराज यांचे मंदिर बांधण्यासाठी त्यांच्या समाधी स्थळाभोवतालची जागा मोकळी करून मिळावी. तसेच, या समाधीस्थळाचा ताबा सांगणारा ट्रस्ट बरखास्त करावा, या मागणीसाठी श्रीगोंदा शहरात गुरुवारी व शुक्रवारी बंद पाळून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनेकांनी आमीन शेख यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती.शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शेख यांनी त्यांची भूमिका मांडली.

गत बुधवारी शेख महंमद बाबा देवस्थान जीर्णोद्धारासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयात आमदार विक्रमसिंह पाचपुते, पोलिस उपअधीक्षक मिलिंद वाखारे, प्रातांधिकारी श्रीनिवास चिंचकर, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, नायब तहसीलदार पंकज नेवसे आदींसह बैठक झाली. या बैठकीत शेख महंमद बाबा दंर्गाह ट्रस्टच्या नावात बदल करून शेख महंमद बुवा देवस्थान करावे, अशी केलेली सूचना आम्ही मान्य केली होती. देवस्थान जीर्णोद्धाराच्या कामासाठी ट्रस्टच्या मान्यतेने एक शासकीय समिती स्थापन करावी लागेल.

या शासकीय समितीत आमदार, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता, ट्रस्ट व यात्रा कमिटीच्या वतीने एक-एक सदस्य, अशा एकूण सात सदस्यांची समिती राहील. ही समिती स्थापन करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने बैठकीत मान्यता दिली.

यात्रा कमिटीनेच विषय अमान्य केले..

शेख महंमद बाबा यांचे वंशज, पुजारी यांची निवासस्थाने देवस्थानच्या जागेतच बांधून द्यावीत. देवस्थानबाबत न्यायालयात असलेले सर्व दावे ट्रस्ट मागे घेईल. यात्रा कमिटीच्या वतीनेही न्यायालयातील दावे मागे घेण्याचे बैठकीत ठरले. मात्र, यात्रा कमिटीने हे ठरलेले विषय अमान्य केले, असे आमीन शेख यांनी म्हटले आहे. देवस्थानचा विकास करण्यासाठी आमची सर्वांना बरोबर काम करण्याची तयारी आहे, असेही शेख यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज़