निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्त्यांनी कर्डिलेंना साथ
राहुरी दि.21-10-2024
राहुरी तालुक्यातील कुलदीप पवार आणि नरेंद्र शेटे यांचा शेकडो कार्यकर्त्यासह माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला असून माजी मंत्री कर्डिले हे हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघातील युवककार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करत आहे मतदारसंघातील जनतेनेच निवडणूक हातात घेतली असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलत आहे.
कर्डिलेंना उमेदवारी जाहीर होताच राहुरी तालुक्यातील कुलदीप पवार अणि नरेंद्र शेटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कर्डिलेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यात सुरेश बानकर, नंदू डोळस, भैय्या शेळके, ज्ञानेश्वर भिंगारदे, रवी म्हसे, सचिन शेटे, उमेश शेळके, अभिजित लिप्टे, भिमराज आव्हाड, रंभाजी गावंडे, बाबासाहेब शिंदे, मच्छिंद्र हरीश्चंद्रे, भाऊसाहेब जाधव, गौतम माळी, अमोल उल्हापुरे, भैय्या बोरूनडे, लक्ष्मण खाचकर रवी बलमे, कृष्णा मोटे, कुलदिप शिरसाठ, सौरभ शिरसाठ, कृष्णा मोटे, लाला शेडगे, पवा गिरासे, श्रीनाथ शेटे, मनोज बाचकर, अविनाथ तोडमल, गणेश रंगले, हेमंत मकासरे, रवेन बाचकर, अविनाश चोपडे, जयपाल गिरासे, युवराज बर्डे, जुनेदभाई इनामदार, दिपक पेंढारेंचा समावेश आहे.
आमदार प्राजक्त तनपुरे यांचा बालेकिल्ला असलेल्या राहुरीतूनच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्त्यांनी कर्डिलेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं विरोधकांच्या गोटात एकच खळबळ उडाली.