ताज्या बातम्याजमीन हस्तांतर प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल,आणखी एक होणार मोठा धमाका

जमीन हस्तांतर प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल,आणखी एक होणार मोठा धमाका

spot_img
spot_img

आणखी एक मोठे प्रकरण नगरीपंच लवकरच आणणार समोर

श्रीगोंदा दि.17 जानेवारी 2025

श्रीगोंदा शहरातील घोडेगाव रस्त्यावरील दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेची नगरपरिषद सर्व्हे नं १७४९मधील १० हेक्टर९२गुंठे शेतजमीन बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय यंत्रणेच्या मदतीने परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात काल रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुजित भैरू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या फसवणूक प्रकरणी १) दीपक नामदेव गायकवाड रा. कोंडोली जि. कोल्हापूर २) सतीश डॅनीयल भालेराव रा.श्रीगोंदा३) वैभव वसंतराव पारधे रा. बारामती जि. पुणे४) संदीपान किसन तुपारे रा. अहिल्यानगर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे की दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेची श्रीगोंदा शहरातील घोडेगाव रस्त्यावर शेतजमीन आहे त्यात संस्थेचे हायस्कुल, चर्च, धार्मिक स्थळे, प्राथमिक शाळा, बालगृह, निवासस्थान आहे या जमिनीची वरील चार जणांनी बनावट कागदपत्रे तयार करून, संगनमताने कट करून शासकीय यंत्रणेच्या मदतीने ही जमीन दीपक गायकवाड यांनी स्वतःच्या नावावर करत तिची नंतर बेकायदेशीर विक्री केली आहे त्यामुळे या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय यंत्रणेतील दोषींवर कारवाई कधी

सदर जमिन विक्री प्रकरणात संस्थेला कोणतीही नोटीस देण्यात आली नाही, संस्थेच्या कार्यालयास किंवा अध्यक्ष यांना याबाबत कोणतेही लेखी कळवले नाही, परस्पर श्रीगोंदा तहसीलदार यांना अहवाल सादर करून तहसीलदार यांनी त्याबाबत कोणत्याही प्रकारे केस (सुनावणी)न चालवता बेकायदेशीर रित्या एकतर्फी निकाल देत दीपक गायकवाड यांच्या नावे सातबाराची नोंद केली आहे त्यामुळे या जमीन विक्री प्रकरणात श्रीगोंदा तहसीलदार तसेच मंडळाधिकारी, यांनी नियमांची पायमल्ली केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शहरालगतच्या अनेक जागा परस्पर N.A

श्रीगोंदा शहरात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहे. या जमिनीचे खाजगीकरण करत नॉन एग्रीकल्चर केले जाते. परंतु यामध्ये आसपासच्या शेतकऱ्यांची कुठलीही संमती न घेता हे नॉन अग्रिकल्चर केले जाते. अधिकाऱ्यांच्या वरद हस्ताने कुठलीही परवानगी नसताना ‘त्या’ जागेत उत्खननही केले जाते. यासंदर्भात शेतकऱ्याने विचारले असता अधिकाऱ्यांकडून त्याला उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येतात. यावरून हेच सिद्ध होते की यामध्ये अधिकारीच नाही तर संपूर्ण यंत्रणाच भ्रष्ट असल्याचं जाणवतं आणि या भ्रष्ट यंत्रणेचा सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.अधिकारी व मोठमोठे प्रोजेक्ट वाले यांचे लागेबांधे आहेत. यासंदर्भात नगरीपंचच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले असून लवकरच नगरीपंच हे सर्व जनतेसमोर आणणार आहे.

लेटेस्ट न्यूज़