महाविकास आघाडीच्या रँली दरम्यान कुटुंबाला मारहाण महिला जखमी
अहमदनगर : दि.3 मे 2024
महाविकास आघाडीची रॅली अहमदनगर शहरातील कल्याण रोडवर प्रचार फेरी काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीवेळी कल्याण महामार्गावरून एक कुटुंब आपल्या गाडीतून प्रवास करत असताना त्यांना मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत एक महिला जखमी झाली असून दोन जणांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडीने शिवाजीनगर उपनगर भागामध्ये प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही प्रचार फेरी नगर कल्याण महामार्गावरून जात असतील स्विफ्ट गाडीमध्ये कुटुंब प्रवास करीत होतं. गाडी चालवताना हॉर्न वाजवल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कुटुंबावर हल्ला केला. नंतर त्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत शोभा कदम ही महिला जखमी झाली. जखमी महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुजय विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार हे खुलेआम धमकी देत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आहे. त्यातूनच गेल्या तीन ते चार दिवसांपासून असे प्रकार वाढत चालले आहेत. या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी म्हटलं की, मात्र हा प्रकार पुढे घडला हे मला माहीत नाही. मात्र हातात सत्ता असल्यामुळे आम्हाला त्रास देण्याचे काम सध्या जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला.