Friday, June 13, 2025

प्रशिक्षकाकडून अल्पवयीन खेळाडूच्या करियरचा ‘खेळ’, अल्पवयीन खेळाडूवर अत्याचार..!

प्रशिक्षकासह तिघांना अटक, भोपाळला नेऊन अत्याचार

श्रीगोंदा दि.13 मे 2025

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा लावणारी घडना कर्जत तालुक्यात घडली.

कर्जत तालुक्यातील १७ वर्षीय कबड्डीपटू युवतीला परदेशात खेळण्याची संधी व मोठ्या पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून भोपाळ येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २८ ते ३१ जानेवारी दरम्यान घडला. याप्रकरणी क्रीडा शिक्षक शिवाजी वाबळे (रा. दहिगाव-ने, ता. शेवगाव) याच्यासह रमेश गांगर्डे (रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत) व अंकुश भेंडेकर यांना पोलिसांनी अटक केली.

 

पुण्यातील वाकड पो.ठाण्यात बलात्कार, अॅट्रोसिटीसह गुन्हा दाखल झाला. पीडित मुलगी बारावीत शिकत असून ती जिल्हा स्तरावर कबड्डी व कुस्ती खेळली आहे. आरोपी शिक्षकाने तिला परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवून तिला नेवासे येथे आणले. तेथून पुढे नेण्याचे काम रमेश गांगर्डे याने केले. वाटेत त्याने एका हॉटेलमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला. तिला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. नंतर शिवाजी वाबळेने स्वतःच्या गाडीतून तिला संभाजीनगर मार्गे भोपाळला नेले. तिथेही अत्याचार केला.पुढे

स्पर्धेसाठी प्रायव्हेट अकॅडमी जॉईन करावी लागेल, असे सांगून पुण्यात राहण्याचा सल्ला दिला. नकार दिल्यास तिच्या भावाला इजा पोहोचवण्याची धमकीही दिली. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी मुलीला पुण्यातून पैठण नंतर राहुरीला नेले.

पोलिसांनी आरोपींना अटक केली व मुलीला सुधारगृहात ठेवले. मुलीने सुधारगृहातून सुटल्यावर पालकांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी तिचा इन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आला. बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत सकट यांनी घटनेचा पाठपुरावा केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या