श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न
श्रीगोंदा दि.3 जानेवारी 2024
चांडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ. डॉ. प्रणोती(माई) राहुल दादा जगताप पाटील या उपस्थित होत्या.
त्यांनी प्रथमतः क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यांना विनम्र अभिवादन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रश्न उत्तर पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद सुरू केला. आहारापासून विद्यार्थ्यांना होणारे फायदे व तोटे, विविध आजार, लहान मुलांमध्ये होत असलेले मोठमोठे आजार यांची माहिती देऊन सदृढ शरीरामध्ये सदृढ मन वास्तव्य करते याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.
त्याचबरोबर मानसिक विकासासाठी विद्यार्थ्यांनी चांगल्यांची संगती ठेवणे, आई-वडिलांशी मित्रत्वाने आणि प्रेमाने वागणे. परिस्थिती जीवनात कधीच अडथळा निर्माण करत नाही, आपले कष्ट, अभ्यास या गोष्टी कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची ताकद निर्माण करतात. त्यासाठी मुलींनी स्वतःच्या पायावरती उभा राहीपर्यंत शिक्षण घ्यावे व आपला व आपल्या आई-वडिलांचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. संकटांना खचून जाणे व आत्महत्या करणे, हे जीवन नाही तर संघर्षातून यश संपादन करणे हा जीवनाचा खरा अर्थ त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. शेवटी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवावं असा बहुमोल सल्ला विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थिनींमध्ये उत्कृष्ट भाषण करणारी इ. दहावीची विद्यार्थिनी श्रद्धा रमेश लोंढे हिचे कौतुक केले.
त्याचबरोबर इमारत बांधकामासाठी मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी आमदार श्री. राहुल दादा जगताप पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाला फाटा देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. सोमनाथ म्हस्के यांच्या नियोजनानुसार चांडगाव मधील शेतकऱ्यांनी केलेल्या एक लाख रुपये मदतीबद्दल सर्व शेतकऱ्यांचे जमीन देणगीदारांपासून व इतर सर्व देणगीरांना धन्यवाद दिले.
या कार्यक्रमासाठी आलेल्या महिला पालकांचे व कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री. पोटरे सर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जामदार सर यांनी केले श्री. गायकवाड सर यांनी सूत्रसंचालन केले व श्री. जरे सर यांनी आभार व्यक्त केले. तर श्रीम.पडवळ मॅडम, श्रीम.शिंदे मॅडम, व श्रीम. भालेकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.