शून्यातून उभे विश्व निर्माण करणाऱ्या अवलियांचा सन्मान
श्रीगोंदा दि.25 मे 2024
कुकडी कालव्यात सुरुंग घेऊन पाण्याला वाट मोकळी करुन चळवळीत खारीचा वाटा उचलणारी लोणीव्यंकनाथ येथील माता स्व. मालनबाई धोंडीबा काकडे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्ताने किर्तन, भावपुर्ण श्रध्दांजली ऐवजी व्याख्यान १२ शाळांना लेखनफळे भेट आणि अग्नीपंख फौंडेशनने शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अवलियांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सिल्लोड येथील पुणेरी उद्योग समुहाच्या संचालिका श्रध्दा शिंदे यांनी छोटे व्यवसाय करिअरचे राजमार्ग या पहिले पुष्प गुंफले तर हभप अविनाश महाराज सांळुके यांनी आई संस्कारांचे विद्यापीठ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. यावेळी मनिषा बाळासाहेब काकडे यांनी २५हजार संतोष नागवडे यांनी २१ हजार तर लोणीव्यंकनाथ येथील मुस्लिम वेलफेअर फौंडेशनने पाच हजाराची अग्नीपंखला मदत केली.
यावेळी व्यंकनाथ विद्यालय लोणीव्यंकनाथ जि.प. शाळा लोणीव्यंकनाथ मडकेवाडी नगरे वाडी भनाळी महादेववाडी पार्वतवाडी शेंडेवाडी खामकरवाडी साळवे वस्ती काकडेवाडी( दक्षिण) आणि कोळपे पवारवाडी या शाळांना लेखनफळे भेट देण्यात आली.
हा सन्मान भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकरराव राहणे माजी आमदार राहूल दादा जगताप, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस, सौ.प्रतिभा ताई पाचपुते, तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे उद्योजक राजेंद्र नलगे पारनेरचे माजी सभापती सुदाम पवार सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक संजय सातव श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतिशचंद्र सुर्यवंशी यांचे हस्ते करण्यात आला.
मधुकर राहणे म्हणाले कि श्रीगोंद्याचे जेष्ठ पत्रकार बाळासाहेब काकडे यांच्या मातोश्री कि ज्यांनी आयुष्यभर पाषाणाशी संघर्ष केला अशा आईंच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने शुन्यातून विश्व निर्माण करण्याऱ्या छोटे शेतकरी व्यापारी उद्योजक यांचा सन्मान आणि शाळांना लेखनफळे भेट देण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला असे सकारात्मक बदल समाजात होणे काळाची गरज आहे. सुत्रसंचलन प्रा शंकर गवते तर आभार प्रा धर्मनाथ काकडे यांनी मानले..
चौकट
सन्मानार्थी…
धनराज बोगावत, रमेश खुराणा, बापुराव गांजुरे, दत्तात्रय म्हस्के, राजेंद्र दंडनाईक, संतोष नागवडे, बाळासाहेब दांगट, श्रध्दा शिंदे- ढवळे, शितल माने, रामदास कांडेकर, डॉ संतोष ओव्हळ, मुन्नाभाई शेख, उत्तम इंगळे, चंद्रकांत चौधरी मिंलीद भोयटे, सुनील ढवळे, दिलीप मुथा, शिवाजी दरंदले, नवनाथ शिंदे, चेतनकुमार शर्मा