Friday, December 20, 2024

आ.रोहित दादा पवार मित्र मंडळ व मृत्युंजय ग्रुप यांच्यावतीने एमआयडीसीचा अनोखा देखावा.

कर्जत शहरात मृत्युंजय ग्रुप व आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने कर्जत जामखेडच्या एमआयडीसीच्या प्रतिकृतीचा भव्य आणि आकर्षक देखावा.

रविवारपासून पुढचे पाच दिवस नागरिकांना पाहता येणार हा लक्षवेधी देखावा; पहिल्याच दिवशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी.

कर्जत जामखेड मतदारसंघात औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी आ.रोहित पवार हे आमदार झाल्यापासूनच प्रयत्न करत होते. त्यातच यासाठी त्यांनी वेळोवेळी आवश्यक तो पाठपुरावा आणि विधिमंडळ आवारात उपोषण देखील केल्याचे सर्वश्रुत आहे. अशातच मंजूर असलेली पण राजकीय दबावापोटी अथवा द्वेषातून होत नसलेली कर्जत – जामखेडची एमआयडीसी ही गणपतीसमोरील भव्य आणि आकर्षक अशा देखाव्यातून साकारण्याचा छानसा प्रयत्न कर्जत शहरातील मृत्युंजय ग्रुप व आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आला आहे.

रविवार 24 सप्टेंबर पासून हा एमआयडीसीचा देखावा मतदारसंघातील सर्व नागरिकांना बघण्यासाठी खुला करण्यात आला आहे. रविवारपासून पुढील पाच दिवस नागरिकांना एमआयडीसीची प्रतिकृती असलेला हा आकर्षक देखावा पाहता येणार आहे. त्यासाठी पहिल्याच दिवशी नागरिकांनी महात्मा गांधी विद्यालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, मतदारसंघातील युवांना रोजगार मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करून आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसी मंजूर करून आणली. याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती देखील नागरिकांना मिळावी यासाठी ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. एमआयडीसीची माहिती त्याबरोबरच त्यासाठी सुरुवातीपासून आमदार रोहित पवार यांनी कशा पद्धतीने पाठपुरावा करून ती एमआयडीसी मंजूर करून आणली याबाबतचा लेखाजोगा या ठिकाणी सविस्तरपणे मांडल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मतदारसंघातील सर्व नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी कर्जत शहरातील महात्मा गांधी विद्यालयासमोर यावे असे आवाहन मृत्युंजय ग्रुप व आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अशा पद्धतीने उत्तम देखावा साकारल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी देखील सर्व युवांचे आभार मानत तोंड भरून कौतुक केले आणि येत्या काळातही युवांच्या बाजूनेच कायम लढत राहू, असा विश्वास सर्वांना दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या