पिसोरेखांड सेवा संस्थेच्या गलथान कारभाराविरोधात शरद श्रीराम यांचे उपोषण
श्रीगोंदा दि.29 डिसेंबर 2023
श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाच्या गलथान कारभाराविरोधात सभासद शरद श्रीराम यांनी मंगळवार दि. २६ पासून श्रीगोंदा सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी योग्य कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शरद श्रीराम यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले.
यावेळी जागृत सभासद शरद श्रीराम यांनी सांगितले की ही संस्था पिसोरेखांड येथील शेतकऱ्यांची कामधेनु असून संस्थेतून तेथील सभासद शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. त्यातून सभासद विविध हंगामात पिके घेऊन उदर निर्वाह करतात. गेल्या काही वर्षांपासून संचालक मंडळ व चेअरमन यांच्या मनमानी व असुरक्षित कारभारामुळे संस्थेचे कामकाज दोन ते तीन महिन्यापासून ठप्प आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या आपसातील वादामुळे सभासदांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. संस्थेचा कारभार पुन्हा सुरळीत चालावा पदाधिकाऱ्यांनी व नियमानुसार सुरळीत कारभारकरण्यासाठी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब दुतारे, सुरेश देशमुख व पिसोरेखांड सेवा संस्थेचे उपाध्यक्ष बबन श्रीराम, सभासद नानासाहेब श्रीराम, भुजंग गावडे, लालासाहेब गावडे, किरण श्रीराम उपस्थित होते.