Saturday, December 21, 2024

आ. राम शिंदेंना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी केली एवढ्या रुपयांची मदत

आमदार प्रा राम शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्याने केली २५ हजाराची आर्थिक मदत 

जामखेड :दि.2 नोव्हेंबर 2024

कर्जत जामखेड मतदारसंघाच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी सुरु असलेला भूमिपुत्रांचा लढा आता निर्णायक वळणावर पोहचला आहे. रोहित पवाररूपी धनदांडग्या असणाऱ्या प्रस्थापित अश्या बलाढ्य शक्तीविरोधात निवडणूक लढण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी स्वखुशीने आमदार प्रा राम शिंदे यांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली आहे.

 

जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथील गणेश जायभाय व रेश्मा जायभाय या दाम्पत्याने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार प्रा राम शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी २५ हजाराची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश जायभाय व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज २ नोव्हेंबर रोजी आमदार प्रा राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेत २५ हजाराच्या आर्थिक मदतीचा धनादेश आमदार शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सचिन जायभाय, महेश गर्जे,मंगेश जायभाय, दत्ता फुंदे, अशोक जायभाय, गोकुळ जायभाय, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आमदार प्रा राम शिंदे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. सालगड्याचा मुलगा ते आमदार मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. गोरगरिबांचा नेता अशी त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. यंदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा सामना रोहित पवार या धनदांडग्या असलेल्या प्रस्थापित शक्तीविरोधात आहे. रोहित पवारांच्या बलाढ्य यंत्रणेविरोधात आता मतदारसंघात सर्वसामान्य स्वाभिमानी कार्यकर्ते एकवटले आहेत. बलाढ्य शक्तीविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांकडून आमदार राम शिंदे यांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात झाली आहे. एकुणच यंदाची विधानसभा निवडणूक सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांनी हातात घेतल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या