ताज्या बातम्याविधानसभेच्या तोंडावर अजित पवार टाकणार मोठा डाव! 'या' पक्षांना बरोबर घेत स्थापन...

विधानसभेच्या तोंडावर अजित पवार टाकणार मोठा डाव! ‘या’ पक्षांना बरोबर घेत स्थापन करणार तिसरी आघाडी?

spot_img
spot_img

अजित पवारांच्या तिसऱ्या आघाडीचे राज्यभर चर्चा 

मुंबई दि.16 जुलै 2024

राज्यात येत्या दोन ते तीन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहे. सध्या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत खूश नसल्याचे दिसत आहे. कारण अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी हालचाली करत असल्याची माहीती सूत्रांच्या हवाल्याने समजते.

 

अजित पवार यांच्या या तिसऱ्या आघाडीमध्ये बच्चू कडू, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम सारख्या छोट्या पक्षांचा समावेश असू शकतो. जर भविष्यात ही आघाडी स्थापन झाली तर राज्याच्या राजकारणाला मोठे वळण मिळणार आहे या शंका नाही.

 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बरोबर असतानाही भाजपला मोठा फटका बसला होता. यानंतर अजित पवारांना बरोबर घेतल्याने महायुतीचे नुकसान झाले अशी टीका अनेकांनी केली होती.

 

आता लोकसभेत बसलेला फटका टाळण्यासाठी भाजपने अजित पवार यांच्यासमोर बंच्चू कडू, वंचित आघाडी आणि एमआयएमला बरोबर घेत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा पर्याय दिला आहे. जर ही आघाडी निर्माण झाली तर याचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

एमआयएम’ची भूमिका

राज्यात सुरू असलेल्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चेबाबत एमआयएमने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिसऱ्या आघाडीच्या चर्चेबाबत बोलताना एमआयएमचे नेते आणि संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “राज्यात तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याच्या चर्चा आहेत. पण याबाबत आम्हाला अजून कोणतीही कल्पना नाही. याबाबच प्रस्ताव अद्याप मिळालेला नाही. पण जर असा प्रस्ताव घेऊन कोण आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू.”

 

जरांगे पाटीलही तयारीला

दरम्यान मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मोनोज जरांगे पाटील यांनीही नुकतेच, “मराठा, धनगर, दलित आणि लिंगायत समाजाने एकत्र यायला पाहिजे. आपण सर्व एकत्र आलो तर सरकारला दणका देत सत्ता परिवर्तन करू शकतो. असे झाले तर प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला आणि गोरगरिबांना न्याय मिळेल” असे म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज़