ताज्या बातम्यापंधरा दिवसांत सर्व अनाधिकृत होल्डिंग काढणार :दि.ना. तारडे

पंधरा दिवसांत सर्व अनाधिकृत होल्डिंग काढणार :दि.ना. तारडे

spot_img
spot_img

आश्वासनानंतर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मीराताई शिंदे यांचे उपोषण मागे

अहमदनगर दि.11 जून 2024

शहरातुन राष्ट्रीय महामार्ग 548 डी गेला आहे या महामार्गावर जीवघेणे अनाधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आले आहे.सहा महिने पाठपुरावा करूनही काही होर्डिंग्ज मालकांना नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग पाठीशी घालत असल्याने शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मिराताई शिंदे यांनी आज 11 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्राणांतिक उपोषण सुरू केले. परंतु उपोषणाला बसण्या पूर्वी च उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अहमदनगर दि.ना.तारडे यांनी शिंदे यांना 15 दिवसात राष्ट्रीय महामार्ग 548 डी या महामार्गावर येत असलेले सर्व अनाधिकृत होर्डिंग्ज काढण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

शहरातुन राष्ट्रीय महामार्ग 548 डी चे जाळे पसरले होते या होर्डिंग्ज मुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी सहा महिन्यांपूर्वी श्रीगोंदा नगरपरिषदे समोर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मिराताई शिंदे यांनी दोन दिवसीय उपोषण केल्यानंतर होर्डिंग्ज काढण्यात आले होते. परंतु त्यापैकी काही होर्डिंग्ज मालकांना नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग पाठीशी घालत असल्याने उरलेले होर्डिंग्ज काढण्यासाठी दिनांक 3 जून 2024 रोजी रोजी जिल्हाधिकारी यांना उपोषणा चे निवेदन दिले होते.

सन 2021 मध्ये उपअभियंता,उपविभाग राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर यांनी नगरपरिषेला लेखी कळवले होते महामार्गाच्या हद्दीत जाहिरात फलक (होर्डिंग्ज) लावण्यास परवानगी देऊ नये असे असतानाही शहरातील राहुल बलदोटा यांच्या व मलांग शाह मस्जिद ट्रस्ट यांच्या खाजगी गटात नगरपरिषेने परवानगी दिली. वारंवार नगरपरिषेला विचारणा केली असता आम्ही ज्या गट नंबर मध्ये परवानगी दिली त्या गटात होर्डिंग्ज उभारलेले नाहीत व जिथे आहेत ते महामार्गा च्या हद्दीत असल्याने त्यावर कारवाई राष्ट्रीय महामार्ग यांनी करावी असे उत्तर देत कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते.

शेवटी उपोषणाचे पत्र दिल्यानंतर नगरपरिषद जागी झाली व सदर होर्डिंग्ज आपल्या हद्दीत असल्याचे दिसून येत असून काही दुर्घटना झाल्यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही असे कळविले व होर्डिंग्ज धारकांनी फसवणूक केली असताना त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी झटकली.

शेवटी 15 दिवसात सर्व होर्डिंग्ज पोलिस बंदोबस्त घेऊन काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मिराताई शिंदे यांनी उपोषण मागे घेतले.

लेटेस्ट न्यूज़