अहमदनगर बातम्याबाळासाहेब मुरकुटे,बागेश्वरधाम दरबारी....

बाळासाहेब मुरकुटे,बागेश्वरधाम दरबारी….

spot_img
spot_img

बागेश्वर धामच्या दरबारी मंत्री,आमदारांची गर्दी…

संभाजीनगर दि.9 नोव्हेंबर 2023

सनातन धर्म आणि हिंदूत्वाची
प्रखर भूमिका मांडणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात भाजपचे मंत्री दररोज हजेरी लावत आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड संयोजक असलेल्या या रामकथा, प्रवचन आणि दरबारामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यातील गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी यापूर्वीच या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यात नुकतेच नेवाशाचे मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नागेश्वर धाम यांचे दर्शन घेतले.

संभाजीनगरात ऐन दिवाळीत आणि लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी आयोजित कार्यक्रमाकडे राजकीय इव्हेंट म्हणूनही बघितले जात आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार त्यांच्या ` परची’ (चिठ्ठी-भविष्यवाणी) साठी ओळखला जातो. सध्याची राज्य आणि देशातील राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येकाला येणाऱ्या निवडणुकीत आपले काय होणार? उमेदवारी मिळणार का? मिळाली तर निवडून येणार का? याची चिंता सतावत आहे.

अशावेळी बागेश्वर धाम यांच्या दरबारात आपली ‘परची’ निघते का? यासाठीही सत्ताधारी मंत्री, आमदारांनी गर्दी केल्याची चर्चा आहे. डॉ. भागवत कराड हे स्वतः प्रत्येकाची ओळख धीरेंद्र शास्त्री यांच्याशी करून देत आहेत. कराड यांच्यासाठी बागेश्वर धामचा दरबार आणि रामकथेचे आयोजन हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेचे आयोजन करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे हेही इच्छुक होते. दोघांनीही मध्य प्रदेशात जाऊन धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेऊन तारीख मिळवण्याचा प्रयत्न केला होता.त्यात कराडांनी बाजी मारली.आणि महिनाभरात सगळी तयारी करून कथेचे आयोजन केले.

सनातन धर्म आणि प्रखर हिंदुत्ववादी विचार धीरेंद्र शास्त्री महाराज आपल्या कथेतून मांडत असल्याने याचा फायदा लोकसभा निवडणुकीत उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने दिग्गज नेते मंडळी सह मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी हजेरी लावली. महाराजांची कृपादृष्टी व्हावी, आपली परची निघावी, यासाठी नेत्यांनी बाबांच्या दरबारात हजेरी लावल्याची चर्चाही या निमित्ताने रंगताना दिसते आहे.

लेटेस्ट न्यूज़