राजरोज सुरू होता वेश्याव्यवसाय ;इतक्या महिलांना रंगेहात पकडले..
श्रीगोंदा दि.28 फेब्रुवारी 2024
श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्तावरील एका हाँटेलात हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरु होता. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे व शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीरा शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व महिलांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास या हाँटेलवर हल्लाबोल करत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसह हाँटेल मालकाला ताब्यात घेतले. श्रीगोंदा पोलिसांत उशीरापर्यंत याबाबतचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.
सामाजिक महिलांनी टाकलेल्या धाडीत हाँटेलच्या व्यवस्थापकासह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील पेडगाव रस्त्यावरील एका हाँटेलात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे व शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षा मिरा शिंदे यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर महिला आक्रमक होत काही सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेत त्यांनी या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर हल्लाबोल केला. त्यावेळी हाँटेलात 2 महिला आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेण्यात आल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. या महिलांसह व्यवस्थापकालाही प्रसाद देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
विशेष म्हणजे या प्रकरणाची पोलिसांना अजिबात कुणकूण नव्हती. श्रीगोंदा परिसरात राजरोस वेश्याव्यवसाय सुरु असून पोलिसांचे खबरे नेमकं करतात काय हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय असून अशा व्यवसायांना कुणाचा राजाश्रय आहे, असा सवाल महिलांमधून उपस्थित केला जात आहे. व्यवस्थापकासह हाँटेल मालकावर व जागा मालकावरही गुन्हे दाखल व्हावेत तसेच या प्रकरणात बडे मासेही अटक व्हावेत अशी अपेक्षा या महिलांनी व्यक्त केली. पोलिस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी व महिलांनी पोलिसांविरोधात जोरदार रोष व्यक्त केला.