प्रचार दौरा संपून परत येत असताना रूपवते यांच्यावर हल्ला, अज्ञात हल्लेखोरांनी केली दगडफेक
अकोला दि.7 में 2024
उत्कर्षा रूपवतेंवर अकोले येथे अज्ञातांकडून भ्याड हल्ला.. हाल्लेखोर पसार झालेला आहे. शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते हया आपले कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमवेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटपून परतत असताना अकोले येथून संगमनेरकडे येत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करत हल्ला केला.हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झालेत.
उत्कर्ष तिरुपती व त्यांच्या गाडीवर झालेले हल्ल्याचा ठीक ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. अकोले पोलिसांकडून सदर घटनेचा तपास केला जात आहे.
पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते.मात्र हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याची अद्यापही माहिती प्राप्त झालेली नाही.राजकीय कारण की दुसरं काही कारण याचा शोध आता अकोले पोलीस घेत आहेत.