ताज्या बातम्याखिडकीचे ग्रील कापून घरफोडी व चोरी करणारा अखेर जेरबंद

खिडकीचे ग्रील कापून घरफोडी व चोरी करणारा अखेर जेरबंद

spot_img
spot_img

 

दौंड पोलिसांची कारवाई; गुन्ह्यात चौघांचा सामावेश,तिघे ताब्यात_

दौंड दि.18 फेब्रुवारी 2024

बांधकाम सुरु असलेल्या एका जुन्या घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरातील बांधकामासाठी लागणाऱ्या त्यामध्ये जॅगवार कंपनीचे नळ, पॉलीकॅपच्या तारा, बेसिन, पातेले व घरातील जुने मोबाईल अशा १ लाख १० हजार किमतीच्या वस्तू चोरी करणाऱ्याला दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी,’दौंड शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागे सुरु असलेल्या घराची घरफोडी करून त्यातील वस्तू चोरी करून अज्ञात चोरट्याने चोरी केली होती.याबाबत अज्ञातावर दि.८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.त्या दरम्यान एका गोपनीय बातमीदारामार्फत दौंड पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरातील सम्राटनगरच्या राहुल नागेश गायकवाड यास ताब्यात घेतले. त्याकडे गुन्ह्याचा सखोल तपास केला असता, त्याने केलेली घरफोडी त्याचे मित्र राहणार भीमनगर व अन्य दोघे विधी संघर्षित बालक) चौघेही (रा.भिमनगर दौंड) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. दौंड पोलिसांनी आरोपिंकडून चोरी केलेल्या ७० हजार रुपयाच्या वस्तू जप्त केल्या आहेत. अल्पवयीन युवकांना ताब्यात घेऊन नातेवाईकांना समज देण्यात आली.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोलिस सुभाष राऊत, नितीन बोराडे, विजय पवार, शरद वारे, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते आदींनी केली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार किरण पांढरे हे करत आहेत.

 

पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज-

या चोरीमध्ये दोन विधी संघर्षग्रस्त मुलांचा सहभाग निष्पन्न झाला. पालकांनी आपली मुले शाळेत जातात का, दिवसा तसेच रात्री कुठे बसतात – उठतात कोणाच्या संगतीत आहेत, काय करतात याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, दौंड पोलीस स्टेशन

लेटेस्ट न्यूज़