Saturday, April 19, 2025

श्रीगोंद्यात बस चालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! अखेर आरोपी अटक…

श्रीगोंद्यात बस चालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! अखेर आरोपी अटक…

श्रीगोंदा दि.18 एप्रिल 2025

श्रीगोंद्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील शाळेच्या खासगी बस चालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यावर प्रचंड गदारोळ माजला आहे. राज्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता श्रीगोंद्यात घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात बदलापूर सारखी घटना घडली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर स्कूल बस चालकाने व त्यांच्या मित्राने अत्याचार केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अल्पवयीन मुलीगी इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. तालुक्यातील एका गावातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसमधील ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. ‘शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का? हा गंभीर प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 1: दादा उर्फ विकी उर्फ चंद्रकांत बाळासाहेब भोसले 2: योगेश अंबादास माळी असे आरोपींचे नाव असून ते श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील राहणारे आहेत.

आरोपींकडून अल्पवयीन मुलीला शाळेतून सोडताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबोणीच्या बागेत नेहून तिच्यावर अत्याचार करत फोटो काढले व तेच फोटो आई-वडील यांना दाखवून जिवे मारण्याची धमकी देत पुन्हा आरोपीच्या राहत्या घरी नेऊन बलात्कार केला. मुलगी घाबरलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्या पिडीत मुलीला पालकांनी विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला आणि नंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीसोबत होत होता, अशी माहिती पालकांनी दिली आहे.

आपल्या मुलीचा लैंगिक छळ केला जात असल्याचे उघड झाल्यावर संतप्त पालकांनी थेट श्रीगोंदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

“अशा नराधमांना कठोर शिक्षा द्या!”, अशी मागणी आता पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.

पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवत दोन्हीं आरोपींना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना आठ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. गुन्हाचा अधिक तपास कर्जत उपविभागाचे पो.उपअधीक्षक विवेकानंद वाखारे हे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या