ताज्या बातम्या – Nagari Punch https://nagaripunch.com Wed, 18 Dec 2024 15:05:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://nagaripunch.com/wp-content/uploads/2024/10/wp-1727982521960-150x150.png ताज्या बातम्या – Nagari Punch https://nagaripunch.com 32 32 मोठी खुशखबर ,1 ते 3 गुंठे जमिनीची करता येणार खरेदी-विक्री https://nagaripunch.com/great-news-1-to-3-guntas-of-land-can-be-bought-and-sold/ https://nagaripunch.com/great-news-1-to-3-guntas-of-land-can-be-bought-and-sold/#respond Wed, 18 Dec 2024 15:04:36 +0000 https://nagaripunch.com/?p=6161 कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मांडलेल्या तुकडेबंदी विधेयकाला सभागृहात एकमताने मंजुरी

नागपूर दि18 डिसेंबर 2024

तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रुपांतरीत करण्‍यात आले. नागपुर हिवाळी आधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्‍ये ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्‍या विधेयकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दि‍ली. या निर्णयामुळे सर्वसामान्‍य नागरीकांनी खरेदी केलेल्‍या १ गुंठा, 2 गुंठे, ३ गुंठे अशा क्षेत्रांचे तुकडे नियमानुकूल होण्‍यास मोठी मदत होईल असा विश्‍वास ना.विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला १० ऑक्‍टोंबर २०२४ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्‍यता घेऊन मा. राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने दिनांक 15/10/2024 अध्यादेश प्रसिध्द करण्यात आलेला होता. या अध्यादेशाचे आज विधिमंडळाच्या मान्यतेने अधिनियमात रुपांतर झालेले आहे.

सन १९४७ साली अमलात आलेल्‍या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदी नुसार प्रत्‍येक जिल्‍ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्‍यात आले होते. मात्र याप्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्‍तांतरण करण्‍यास कायद्याने निर्बंध आहे. यामुळे सर्वसामान्‍य नागरीकांच्‍या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्‍या होत्‍या.

२०१७ साली करण्‍यात आलेल्‍या सुधारणे नुसार सन १९६५ ते २०१७ या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्‍यवहार नियमित करण्‍यासाठी बाजार मुल्‍याच्‍या २५ टक्‍के रक्‍कम शासन जमा करणे आवश्‍यक होते. मात्र ही रक्‍कम सर्वसामान्‍य नागरीकांच्‍या आवाक्‍या बाहेर होती.

या अडचणींमुळे नागरीकांचे आर्थिक व्‍यवहारही थांबले होते. ही अडचण दुर करण्‍यासाठी महायुती सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करुन झालेले व्‍यवहार नियमित करण्‍यासाठी २०१७ सालापर्यंत असलेली मुदत २०२४ पर्यंत वाढविण्‍याबाबत निर्णय करुन, २५ टक्‍क्‍याएैवजी ५ टक्‍के शुल्‍क भरुन या जमीनी नियमानुकूल करण्‍याच्‍या प्रस्‍तावाला मान्‍यता दिलेली होती.

मंत्रीमंडळाने दिलेल्‍या मान्‍यतेनुसार मा.राज्‍यपालांच्‍या संमतीने १५ आक्‍टोंबर २०२४ रोजी अध्‍यादेशही काढण्‍यात आला होता. या अध्‍यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्‍यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेमध्‍ये याबाबतचे विधेयक सादर केले. या विधेयकाला दोन्‍हीही सभागृहात मान्‍यता मिळाल्‍याने तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा मोठा दिलासा राज्‍यातील नागरीकांना मिळणार असून, याबाबत महसूल विभागाने माजी सनदी आधिकारी उमाकांत दांगट यांच्‍या नेमलेल्‍या समितीच्‍या शिफारसीही यासाठी विचारात घेण्‍यात आल्या आहेत.

]]>
https://nagaripunch.com/great-news-1-to-3-guntas-of-land-can-be-bought-and-sold/feed/ 0
आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते दांपत्यांचा ‘या’ मुळे सत्कार… https://nagaripunch.com/the-couple-was-felicitated-by-mla-vikram-pachpute/ https://nagaripunch.com/the-couple-was-felicitated-by-mla-vikram-pachpute/#respond Sun, 15 Dec 2024 10:26:19 +0000 https://nagaripunch.com/?p=6157 वृक्षारोपण करून मुलीच्या जन्माचे केले स्वागत…

श्रीगोंदा दि.15 डिसेंबर 2024

मुलींचा जन्मदर घटत असताना पत्रकार गणेश आणि त्यांच्या पत्नी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ.स्वाती यांना पहिलेच कन्यारत्न झाल्यावर मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्षारोपण करून समाजापुढे आदर्श उभा केल्याचे गौरवोद्गार नवनिर्वाचीत आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेत वृक्ष रोपण प्रसंगी बोलताना काढले.

पत्रकार गणेश व सौ. स्वाती कविटकर यांना ३ महिन्यापूर्वी कन्या रत्न झाले. रविवारी कन्या शार्वी हीचे श्रीगोंदा येथे आगमन झाले. आगमन वेळी देखील बँड पथकाद्वारे स्वागत करण्यात आले. तर शुक्रवारी शहरातील जिल्हा परिषदेच्या मुले, मुली आणि ऊर्दू शाळेच्या आवारात आमदार विक्रम पाचपुते,गट विकास अधिकारी राणी फराटे,मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा मीरा शिंदे,भाजप नेते माजी नगरसेवक दत्ता हिरणवाळे, रामदास ननावरे, प्रकाश बोरुडे,सिनलकर शोभा, रनसिंग अश्विनी, शिंदे माधुरी, शिंदे सोनाली, वाळके ताई,शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी आमदार पाचपुते बोलत होते.

मुलींच्या शाळेत वृक्ष लावल्याने येथील चिमुकल्या विद्यार्थिनी देखील याची निगा राखतील तसेच या कार्यक्रम निमित्ताने शाळा इमारत विषय आला पण शाळा व्यवस्थापन समिती उशिरा आपणाकडे आल्याने संपूर्ण इमारत साठी निधी मिळवता आला नाही पण ५ लाख रुपयांची तरतूद केली होती. शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत १००० पट संख्या असणाऱ्या या शाळेसाठी मंत्रिमंडळ झाल्यावर पालकमंत्री यांच्या मदतीने तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देत आपण नेहमीच सकारात्मक विचार करून काम करत असल्याने शाळेच्या मुले, मुली आणि ऊर्दू शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावू आणि हा प्रश्न देखील शार्वी च्या निमित्ताने पुढे आला ही भाग्याची बाब आहे.

गणेश व सौ. प्रा.स्वाती कविटकर यांनी बोलताना वृक्ष रोपण करण्याची प्रेरणा ह.भ. प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी मिळालेले असून मुलगा मुलगी एकसमान ही संकल्पना रुजावी यासाठी शाळेत वृक्ष रोपण करत आहोत. मुलींनी, मुलांनी या झाडांचे संगोपन करावे असे आवाहन कविटकर दांपत्यांनी केले. यावेळी तिन्ही शाळेच्या वतीने नूतन आमदार विक्रम पाचपुते आणि कविटकर दांपत्याचा सत्कार करण्यात आला.

चौकट

नूतन आमदार विक्रम पाचपुते म्हणाले शहरातील जिल्हा परिषद शाळेचा १००० पट ही अभिमानाची आणि येथील शिक्षकांच्या मेहनतीचे निदर्शक आहे शहरात जिल्हा परिषद शाळा ,आणि विद्यार्थी संख्या एवढी? इमारतीसाठी निधी कोणत्या योजनेत आणायचा हे अनाकलनीय असेल पण श्रीगोंदा तालुकाच अनाकलनीय आहे हा तालुका सगळ्यांना समजला असता तर राजकीय चित्र खूप वेगळे असते ते इतरांना समजत नाही तेच बरे असे म्हणताच हशा पिकला!

]]>
https://nagaripunch.com/the-couple-was-felicitated-by-mla-vikram-pachpute/feed/ 0
हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा… https://nagaripunch.com/datta-birth-ceremony-in-the-presence-of-thousands-of-devotees/ https://nagaripunch.com/datta-birth-ceremony-in-the-presence-of-thousands-of-devotees/#respond Sun, 15 Dec 2024 10:13:52 +0000 https://nagaripunch.com/?p=6154 दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष

श्रीगोंदा : दि 15 डिसेंबर 2024

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या जयघोषासह पुष्पवृष्टी, शंखाचा निनाद करत श्रीगोंद्यातील पंचायत समिती येथील श्री दत्त मंदिरात शनिवारी (दि. १४) सायंकाळी सहा वाजता दत्त जन्म सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.

शनिवारी सायंकाळी सहा वाजता दत्त जन्म सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम अण्णा शेलार, आनंदकर स्पोर्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा मा. संजय आनंदकर सर यांच्या हस्ते दत्त मूर्तीचे पूजन करण्यात आले.

मंदिरासमोर पुष्पांनी सजविलेल्या व्यासपीठावरील पाळण्यामध्ये दत्त मूर्ती ठेवली होती. पूजन झाल्यानंतर वेदमंत्राचा जयघोष, पुष्पवृष्टी करीत भगवान दत्त जन्मोत्सवसाजरा करण्यात आला. यावेळी गुरुवर्य संजय आनंदकर सर यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली. श्रीगोंद्यातील महिलांनी दत्त जन्माचा पाळणा म्हटला.

यावेळी दत्त जन्मोत्सव समितीचे सदस्य, श्रीगोंदा पंचायत समितीचे कर्मचारी वृंद,आनंदकर स्पोर्ट अकॅडमीच्या आजी माजी विद्यार्थ्यांसह वृद्धेश्वर बँकेचे कर्मचारी वृंद, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लापसी-सांबरभात यांचा महाप्रसाद

प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन वृद्धेश्वर बँकेच्या माध्यमातून श्री विठ्ठलराव वाडगे भाऊसाहेब यांच्या वतीने करण्यात आले होते. पंचायत समिती परिसरातील मैदानात लापसी- सांबर,भात, जिलेबी या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याही वर्षी मोठ्या संख्येने भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.

]]>
https://nagaripunch.com/datta-birth-ceremony-in-the-presence-of-thousands-of-devotees/feed/ 0
युवा प्रशिक्षणार्थीना सेवेत कायम करण्याची मागणी https://nagaripunch.com/demand-for-youth-trainees-to-be-retained-in-service/ https://nagaripunch.com/demand-for-youth-trainees-to-be-retained-in-service/#respond Sun, 15 Dec 2024 10:02:18 +0000 https://nagaripunch.com/?p=6151 बेरोजगारीचे संकट-आमदार मोनिका राजळे यांना दिले निवेदन :

शेवगाव दि. 15 डिसेंबर 2024

तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात शासकीय कामाकाजाचे प्रशिक्षण घेत मानधन तत्वावर सेवा देणाऱ्या मुख्यमंत्री तालुका युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने विविध समस्या व मागण्या संदर्भात आमदार मोनिका राजळे यांच्याशी चर्चा करीत निवेदन देण्यात आले. मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीना काही मोजक्या कालावधीकरिता शासकीय कार्यालयात सेवा बजावण्याची संधी देण्यात आली आहे. नंतर त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे सेवा कालावधी वाढविण्यात यावा. भविष्यात होणाऱ्या सरळ सेवा भरतीत त्यांना प्राधान्य देण्यात यावे, त्यांचे कायमस्वरूपी समायोजन होईपर्यंत ते जिथे सद्या कार्यरत आहेत तिथेच कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा कायम करण्यात यावी. त्यांना शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आकस्मिक रजा, वैद्यकीय रजा, प्रवास भत्ता तसेच वेतन अदा करण्यात यावे.

निवेदन देताना संघटनेचे प्रशिक्षणार्थ कर्मचारी नेहा जाधव,भवर सिद्धी,ऋतुजा खंडागळे,अश्विनी गुजार सायली भराड,स्वाती सुतार, शितल राऊत,कांचन सगळे,राऊत शितल संदीप ,राजेंद्र अभंग, रवींद्र बोरूडे,किशोर धोतरे,सुरेश मुंढे,सोमेश्वर फलके,चक्रधर खांबट,आल्हाट पिटर,आघाव योगेश,डोंगरे दिपक आधी हजर होते.

केवळ सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली आहे. सहा महिन्यांचा कालावधी संपत आला असल्याने या युवकांवर बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे.

]]>
https://nagaripunch.com/demand-for-youth-trainees-to-be-retained-in-service/feed/ 0
शेतकऱ्यांच्या व समस्त साई भक्तांच्या कृपेने आजपासून फुल-हार विक्री सुरू : डॉ.सुजय विखे https://nagaripunch.com/with-the-grace-of-farmers-and-all-sai-devotees-sale-of-flower-necklaces-has-started-from-today-dr-sujay-vikhe/ https://nagaripunch.com/with-the-grace-of-farmers-and-all-sai-devotees-sale-of-flower-necklaces-has-started-from-today-dr-sujay-vikhe/#respond Sat, 14 Dec 2024 12:59:01 +0000 https://nagaripunch.com/?p=6147 शेतकऱ्यांच्या व समस्त साई भक्तांच्या कृपेने आजपासून फुलं हार विक्री सुरू: डॉ. सुजय विखे पाटील

शिर्डी दि.14 डिसेंबर 2024

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डी नगरीत हार फुले व प्रसादाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राहाता तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून फुले विक्री सुरू करण्यासाठी संघर्ष केला होता. अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान हे फुल शेतीवर अवलंबून होते आणि साई मंदिरात फुल- हार विक्रीस बंदी घालण्यात आल्यामुळे मोठा तोटा हा सर्वच शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक असा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

दरम्यान श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबा मंदीरात आजपासून हार, फुले आणि प्रसाद विक्री करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली असून आज या विक्री स्टॉल्सचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

कोरोना संकट कालावधीपासून शिर्डी साई मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, साई संस्थेची समिती आणि मंदिरातील नियमावलीनुसार परवानगी मिळाल्याने शेतकरी व समस्त साई भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे देश व जगभरातील साई भक्तांची आस्था होती की, फुलं व हार हे साई समाधी पर्यंत गेले पाहिजेत, ही आस्था आणि श्रद्धा आता पूर्णत्वास आल्याने साई भक्तांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

]]>
https://nagaripunch.com/with-the-grace-of-farmers-and-all-sai-devotees-sale-of-flower-necklaces-has-started-from-today-dr-sujay-vikhe/feed/ 0
आ. संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळावे यासाठी केला शुक्लेश्वर मंदिरात महाअभिषेक https://nagaripunch.com/a-maha-abhishekam-was-done-in-shukleshwar-temple-to-get-sangram-jagtap-as-a-minister/ https://nagaripunch.com/a-maha-abhishekam-was-done-in-shukleshwar-temple-to-get-sangram-jagtap-as-a-minister/#respond Wed, 04 Dec 2024 13:58:11 +0000 https://nagaripunch.com/?p=6142 आ. जगताप यांच्या माध्यमातून मेट्रो सिटीचे स्वप्न साकारले जाणार -शिवम भंडारी

नगर दि.4 डिसेंबर2024

नगर शहर विधानसभा मतदार संघात तिसऱ्यांदा सलग निवडून आलेले आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील ग्रामदैवत शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक घालण्यात आला. शुक्लेश्‍वर मंदिरात विधीवत पूजा पार पडली. याप्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवक काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी, अनिल तेजी, किशोर उपरे, गणेश उपरे, विशाल (अण्णा) बेलपवार, दीपक राहिंज, विशाल राहिंज, आनंद क्षीरसागर, रत्नदीप गारुडकर, प्रमोद जाधव, दिनेश लंगोटे, योगेश देवतरसे, करण पाटील, रवी नामदे आदींसह भिंगार मधील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, संग्राम जगताप हे युवकांचे नेतृत्व असून, त्यांनी शहर व उपनगरांचा विकासात्मक कायापालट केला आहे. त्यांच्या माध्यमातून शहराला मंत्री पदाची संधी मिळावी ही सर्वसामान्य नगरकरांची इच्छा आहे. अनेक वर्षापासून शहराला मंत्री मंडळात स्थान मिळालेले नाही. सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आ. जगताप यांना मंत्रीपद मिळावे ही सर्वांची इच्छा असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

शिवम भंडारी म्हणाले की, शहराच्या सर्वांगीन विकासासाठी आ. जगताप यांना मंत्रीपद मिळणे आवश्‍यक आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन शहरातील विकास कामे मार्गी लावली. विकासात्मक व्हिजन असलेले आ. जगताप यांची मंत्रीमंडळाला देखील चांगली मदत होणार असून, शहराच्या इतिहासात सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. विकासाचे व्हिजन ठेऊन त्यांनी केलेल्या कामाला यापुढे अधिक गती मिळणार आहे. तर त्यांच्या माध्यमातून मेट्रो सिटीचे स्वप्न साकारले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

]]>
https://nagaripunch.com/a-maha-abhishekam-was-done-in-shukleshwar-temple-to-get-sangram-jagtap-as-a-minister/feed/ 0
डॉ.प्रा.राजेंद्र कुमार देवकाते उत्कृष्ट शारीरिक शिक्षण शिक्षक पुरस्काराने सन्मानित. https://nagaripunch.com/dr-prof-rajendra-kumar-devkate-honored-with-the-outstanding-physical-education-teacher-award/ https://nagaripunch.com/dr-prof-rajendra-kumar-devkate-honored-with-the-outstanding-physical-education-teacher-award/#respond Wed, 27 Nov 2024 12:08:05 +0000 https://nagaripunch.com/?p=6138 फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्याकडून नवी दिल्ली येथे स्विकारला पुरस्कार..

श्रीगोंदा दि.27नोव्हेबर 2024

फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या कडून अहमदनगर क्रीडा विभागाचे सचिव प्रा.डॉ. राजेंद्रकुमार सुखदेव देवकाते यांच्या शारीरिक शिक्षण, योगा, व आरोग्य या विषयांमधील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दि .२४नोव्हेंबर २०२४ रोजी न्यू दिल्ली येथे उत्कृष्ट शारीरिक शिक्षण शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामजिक, शारीरिक,शैक्षणिक तथा क्रीडा, योगा आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असल्याने प्रा.डॉ.राजेंद्र कुमार देवकाते यांना केंद्रिय स्तरावर हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

प्रा.डॉ.राजेंद्रकुमार सुखदेव देवकाते यांनी शारीरिक शिक्षण, योगा, व आरोग्य या विषयांमध्ये अनेक संशोधन पेपर प्रसिध्द केलेले आहेत. त्यांनी अनेक पुस्तके ही लिहीली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी हे चांगल्या उच्च पदाच्या नोकऱ्यांवरती विराजमान आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील अनेक खेळाडू विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी राष्ट्रीय व ऑल इंडिया पातळीवरती उच्च कामगिरी केलेली आहे. आणि सलग दोन वर्ष झाले ते अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाचे अतिशय कर्तव्यनिष्ठ, जबाबदारपणे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शारीरिक शिक्षण विषयाबरोबरच योगशास्त्र विषयामध्ये सुद्धा रुची दाखवत योगशास्त्र विषयातील ज्ञान अवगत करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाला या ठिकाणी योगा कोच ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेले आहे. त्याचबरोबर एम ए योगशास्त्र हा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यांनी योगा मध्ये सुद्धा नेट परीक्षा ऊतीर्ण केलेली आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला नवी दिल्ली येथे फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी बहुमान दिला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे महात्मा फुले नूतन महविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. ए.बी चेडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व सर्व विद्यार्थी, श्री संत गजानन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. राजू देविदास म्हेत्रे, डॉ. कासले विठ्ठल, प्रा.श्रीकांत तनपुरे, संघर्षनामा मल्टिमीडियाचे मुख्यसंपादक, मेजर भिमराव उल्हारे, पत्रकार उज्वला उल्हारे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

]]>
https://nagaripunch.com/dr-prof-rajendra-kumar-devkate-honored-with-the-outstanding-physical-education-teacher-award/feed/ 0
आ. पाचपुते अल्पसंख्यांकांचे नेतृत्व : शकुरभाई शेख https://nagaripunch.com/shakurbhai-sheikh-is-the-leader-of-the-five-member-minority/ https://nagaripunch.com/shakurbhai-sheikh-is-the-leader-of-the-five-member-minority/#respond Sun, 17 Nov 2024 05:48:21 +0000 https://nagaripunch.com/?p=6134 मुस्लिम समाज विक्रम पाचपुते यांच्याबरोबर

श्रीगोंदा : दि.17 नोव्हेंबर 2024

तालुक्यात मुस्लिम समाजाच्या सभागृहासाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला तसेच विविध गावात मुस्लिम समाजासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार बबनराव पाचपुते हे अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व आहे. त्यामुळे याही निवडणुकीत मुस्लिम समाज विक्रम पाचपुते यांच्या बरोबर राहणार असल्याचे प्रतिपादन अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष शकुरभाई शेख यांनी पत्रकाव्दारे केले.

 

आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून मागील अडीच वर्षात विक्रम पाचपुते यांनी मोठा प्रमाणात विकास निधी तालुक्यात आणला त्यामध्ये मुस्लिम समाज हा विक्रम पाचपुते यांच्या बरोबर राहणार आहे. शहरातील ईदगाह मैदानावर सभागृहासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी दीड कोटी रुपये निधी दिला तसेच तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या मतदार संघात ठिकठिकाणी कब्रस्थान वाल कंपाऊंड, सुशोभीकरण, साठी निधी दिला आहे.

 

महायुती सरकार काळात गेल्या दिड वर्षात मतदार संघात ३० ठिकाणी कब्रस्थान वाल कंपाऊंड सुशोभीकरण साठी निधी दिला. १२ ठिकाणी दर्गाह सभामंडप, रस्ते आदी कामे केली आहेत. त्यामुळे विक्रम पाचपुते यांच्या बरोबर मुस्लिम समाज असणार असल्याचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शकुरभाई शेख यांनी सांगितले.

]]>
https://nagaripunch.com/shakurbhai-sheikh-is-the-leader-of-the-five-member-minority/feed/ 0
आ. रोहित पवारांना मोठा दिलासा, “या” गोष्टी करण्यास कोर्टाचा मनाई आदेश https://nagaripunch.com/a-big-relief-to-rohit-pawar-is-the-injunction-of-the-court-to-do-these-things/ https://nagaripunch.com/a-big-relief-to-rohit-pawar-is-the-injunction-of-the-court-to-do-these-things/#respond Sun, 17 Nov 2024 05:13:01 +0000 https://nagaripunch.com/?p=6131 बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनी व संचालक मंडळाविरोधात आरोप आणि बदनामीकारक वक्तव्ये करण्यास कोर्टाचा मनाई आद

कर्जत,जामखेड दि.17 नोव्हेंबर 2024

खोटेनाटे आरोप व आत्मदहनच्या धमक्यांबद्दल ‘बारामती ॲग्रो कंपनी’ने बारामती न्यायालयामध्ये 10 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा आणि संबंधित लोकांना बारामती ॲग्रो कंपनी व संचालक मंडळाविरुद्ध (आ.रोहित पवार) बदनामीकारक मजकूर तयार करणे आणि प्रसारित करणे याविरोधात मनाई मिळण्यासाठी दावा दाखल केला आहे.

यामध्ये संपूर्ण दाखल कागदपत्रांचे, व्हिडीओ क्लिपचे, आत्मदहनाच्या धमक्याचे आणि न्यायालयीन निकालांचे अवलोकन केले असता विरोधकांचे सर्व आरोप हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कंपनीची आणि कंपनीच्या संचालकांची होणारी बदनामी थांबवण्यासाठी कंपनीने मे. न्यायालयाकडे एकतर्फी मनाई मिळणेकामी विनंती अर्ज केला आहे.

यामध्ये सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता बारामती न्यायालयाने बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनी व संचालक मंडळांच्या विरोधात दि. २५/११/२०२४ पर्यंत कोणतेही खोटेनाटे आरोप करणे, बदनामीकारक मजकूर तयार करणे, तो प्रसारित करणे आणि जाहीर करणे याबाबत मनाई आदेश पारित केलेला आहे. सदर प्रकरणामध्ये बारामती ॲग्रो कंपनीच्या वतीने अँड. प्रसाद खारतुडे यांनी काम पाहिले.

कोट

“न्यायालयाच्या मनाई आदेशाचे पालन न केल्यास, संबंधितांविरुद्ध कोर्ट आदेश अवमान याचिकाही दाखल करण्याच्या तयारीत आम्ही आहोत.”

ॲड. प्रसाद खारतुडे

]]>
https://nagaripunch.com/a-big-relief-to-rohit-pawar-is-the-injunction-of-the-court-to-do-these-things/feed/ 0
आमच्या धोरणामुळे तुमची अडचण झाली राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरात यांना टोला https://nagaripunch.com/radhakrishna-vikhes-advice-to-balasaheb-thorat-is-because-of-our-policy/ https://nagaripunch.com/radhakrishna-vikhes-advice-to-balasaheb-thorat-is-because-of-our-policy/#respond Sun, 17 Nov 2024 05:00:37 +0000 https://nagaripunch.com/?p=6128 आश्वी येथील सभेतून मंत्री विखेंचे थोरातांवर टीकास्त्र

आश्‍वी, दि.17 नोव्हेंबर2024

नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्‍या निवडणूकीत जे महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्‍यांनी आम्‍हाला पक्ष निष्‍ठेच्‍या गोष्‍टी शिकवू नयेत. ज्‍यांनी स्‍वत:च्‍या निष्‍ठाच भाजप, सिल्‍व्हर ओक आणि मातोश्रीच्‍या चरणी अर्पण केल्‍या आहेत त्‍यांना तालुक्‍यातील जनतेप्रती निष्‍ठा राहीलेल्‍या नाहीत. ज्‍यांनी सहकारी संस्‍था काढून दिल्‍या त्‍यांची आठवणही न ठेवणारे जनतेला कधी विसरतील हे सांगता येत नाही. कोणताही विकास न करता हसून जिरविण्‍याचे काम करणा-यांचा राजकीय दशहतवाद जनता उखडून टाकल्‍याशिवाय राहणार नाही असा इशारा महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला.

 

आश्‍वी येथे आयोजित केलेल्‍या महायुतीच्‍या सभेमध्‍ये मंत्री विखे पाटील यांनी आ.थोरात यांच्‍या निष्‍क्रीय कार्यपध्‍दतीवर पुन्‍हा एकदा टिकास्‍त्र सोडले. आमचे सरकारचे वाळू धोरण फसले म्‍हणणा-यांचे माफीया फसले आहेत, आमचे वाळू धोरण चांगलेच आहे. या धोरणामुळे तुमची अडचण झाली आहे. हीच परि‍स्थिती त्‍यांच्‍या दूध संघाचीही झाली आहे. यांचा दूधसंघ येवढा चांगला आहे तर, सरकारला अनुदान देण्‍याची वेळ का आली? महायुती सरकारचे सुमारे १० कोटी रुपयांचे अनुदान आम्‍ही राजहंस दूध संघाला दिले. यामध्‍ये आम्‍ही राजकीय अभिनिवेश ठेवला नाही. आम्‍हाला दूध धंदा कळत नाही असे म्‍हणणा-यांनी एकदा महानंदामध्‍ये आपल्‍या जावयाने काय केले हे एकदा तपासून पाहा, तुमच्‍या अमृतवाहीनी बॅकेची आवस्‍था कशी नाजुक झाली आहे हे आता सांगायला लावू नका असे सुचक वक्‍तव्‍यही त्‍यांनी आपल्‍या भाषणात केले.

 

पद्मश्री विखे पाटील यांनी संगमनेर कारखाना उभारुन दिला. पहिल्‍या संचालक मंडळात तर भाऊसाहेब थोरात सुध्‍दा नव्‍हते. पण ज्‍यांनी कारखाना उभारणीत योगदान दिले त्‍यांची आठवणही यांनी ठेवली नाही. आज पद्मश्रींनी दाखविलेल्‍या मोठ्या मनामुळे तुम्‍हाला समृध्‍दी प्राप्‍त झाली आहे. सह्याद्री शिक्षण संस्‍थाही काढणा-यांचा विसर आ.थोरातांना पडला हाच त्‍यांचा राजकीय दहशतवाद असल्‍याचा आरोप करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, सुसंस्‍कृत तालुका म्‍हणून मिरवून घेता आणि साईबाबांच्‍या दरबारात येवून धांदात खोट बोलता.

 

३० हजार युवकांना रोजगार दिल्‍याचा दावा तुम्‍हाला तरी खरा वाटतो का असा प्रश्‍न उपस्थित करुन, पक्ष निष्‍ठेच्‍या गोष्‍टी करणा-या थोरातांनी नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीशी कशी गद्दारी केली याची आठवण करुन देत, यांच्‍या निष्‍ठा आता दुपारी सिल्‍व्‍हर ओक आणि भाजप नेत्‍यांशी आहे. रात्री तुम्‍ही कोणकोणत्‍या भाजप नेत्‍यांना भेटता हे आता मला बोलायला लावू नका असेही ना.विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

 

निळवंडे धरणाच्‍या बाबतीत तीस वर्ष लोकांची फसवणूक केली. अनेक वर्ष मंत्री राहीलात, पण पहिल्‍या २० कि.मी अंतरावरील काम तुम्‍हाला सुरु करता आले नाही. शरद पवार यांनी सुध्‍दा येवून चार चार वेळा भूमीपुजन केले. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या पुढाकारामुळे कालव्‍यांची कामे झाली आणि पाणी आले हे पुण्‍य आम्‍ही करतो. जे ३५ वर्षात झाले नाही ते आम्‍ही दोन वर्षात करुन दाखविले. उर्वरित कामासाठी केंद्राकडून ८०० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला असल्‍याने ना.विखे पाटील म्‍हणाले.

अडीच वर्षात एकही विकासचे काम महाविकास आघाडी कडून झाले नाही. तसेच या गावांना २००९ पासून मीच दत्‍तक घेतले. कुठल्‍याही सुविधा या गावांना नव्‍हत्‍या. ही गावे आपल्‍या मतदार संघात जोडल्‍यानंतर भविष्‍यातही या गावातील विकासाला निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

 

कोट

आ.बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे प्रकल्पग्रस्‍तांच्‍या पुर्नवसनासाठी जमीन दिल्‍याचा वारंवार उल्‍लेख करतात, पण या जमीनी पुन्‍हा जावयाच्‍या नावावर कशा झाल्‍या हे मंत्री विखे पाटील यांनी सभेतमध्‍ये ७/१२ उतारा दाखवून त्‍यांचा खोटेपणा उघड केला. मीही आता महसूल मंत्री आहे हे ते विसरुन गेले आहेत. त्‍यांचे असे अनेक उतारे माझ्याकडे आहेत.

कोट

प्रियंका गांधींच्‍या सभेवर आपली प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, त्‍यांच्‍या सभेतून दुसरे तिसरे काही नाही तर बौध्‍दीक दिवाळखोरी समोर आली आहे.

]]>
https://nagaripunch.com/radhakrishna-vikhes-advice-to-balasaheb-thorat-is-because-of-our-policy/feed/ 0