महाराष्ट्र – Nagari Punch https://nagaripunch.com Wed, 15 Nov 2023 10:49:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://nagaripunch.com/wp-content/uploads/2024/10/wp-1727982521960-150x150.png महाराष्ट्र – Nagari Punch https://nagaripunch.com 32 32 उद्या चौंडी येथे आ.पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत मंजूर कोट्यावधींच्या विकास कामांचे भूमिपूजन https://nagaripunch.com/bhumi-puja-of-sanctioned-development-works-worth-crores-will-be-held-tomorrow-at-chaundi-in-the-presence-of-aa-pawar-and-dignitaries/ https://nagaripunch.com/bhumi-puja-of-sanctioned-development-works-worth-crores-will-be-held-tomorrow-at-chaundi-in-the-presence-of-aa-pawar-and-dignitaries/#respond Wed, 15 Nov 2023 10:46:14 +0000 https://nagaripunch.com/?p=4425 जयंत पाटील, सुषमा अंधारे,विश्वजीत कदम यांच्यासह युवराज भूषणसिंह होळकर राहणार उपस्थित

जामखेड दि.15 नोव्हेंबर 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी आमदार झाल्यापासूनच महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली होती. परंतु, राज्य शासनाने विविध कामांवर स्थगिती लावली होती. परंतु त्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर ती कामे सुरू करण्यासंदर्भात हिरवा कंदील मिळाला. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ विकासासाठी आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. त्यापैकीच जवळपास ७ कोटींच्या कामांचे भव्य भूमिपूजन गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी येथे पार पडणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळी संग्रहालय बांधकाम, जन्मस्थळी असलेल्या नदीकाठी घाटाचे बांधकाम व सुशोभीकरण करणे त्याबरोबरच जन्मस्थळी दोन भव्य मोठ्या स्वागत कमानीचे बांधकाम अशा तब्बल ७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन चौंडी येथे पार पडणार आहे. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज युवराज भूषणसिंह राजे होळकर, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, माजी मंत्री,आ.विश्वजीत कदम साहेब व शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता हा भूमिपूजन सोहळा शासकीय विश्रामगृहाशेजारील मैदान चौंडी येथे पार पडणार असून त्यावेळी सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ चौंडी येथे जिल्हा परिषद शाळा बांधकाम करण्यासाठी दोन कोटी तीन लाख व सीना नदीवर पश्चिम घाटाचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ९९ लाख अशी कोट्यावधींची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. त्यानंतर आता आणखी ७ कोटींच्या विकासकामांचे भव्य दिव्य असे भूमिपूजन चौंडी येथे केले जाणार आहे.

सर्व कर्जत-जामखेड मधील नागरिक, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व युवा वर्गाने या भूमिपूजन सोहळ्याला व सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. यासोबतच चौंडी येथून युवा संघर्ष पदयात्रेच्या देखील पुढच्या टप्प्याला सुरुवात होणार असून पुणे ते नागपूर अशा पदयात्रेच्या पुढील टप्प्याला देखील सुरुवात केली जाणार आहे. त्यानुसार आता यात्रा चौंडी येथून पुन्हा एकदा सुरू होऊन ती यात्रा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे.

]]>
https://nagaripunch.com/bhumi-puja-of-sanctioned-development-works-worth-crores-will-be-held-tomorrow-at-chaundi-in-the-presence-of-aa-pawar-and-dignitaries/feed/ 0
मतदारसंघात रोहित पवारांना मोठा धक्का..! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश https://nagaripunch.com/rohit-pawars-big-shock-in-the-constituency-is-the-entry-of-hundreds-of-workers-into-bjp/ https://nagaripunch.com/rohit-pawars-big-shock-in-the-constituency-is-the-entry-of-hundreds-of-workers-into-bjp/#respond Mon, 13 Nov 2023 07:45:40 +0000 https://nagaripunch.com/?p=4404 आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत चौंडीत पार पडला भव्यपक्षप्रवेश सोहळा..

चौंडी दि.13 नोव्हेंबर 2023

ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत शिंदे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादीची साथ सोडत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा रविवारी आ. प्रा राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी पार पडला. प्रशांत शिंदे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. जवळा ग्रामपंचायतवर आता भाजपचा कब्जा झाला आहे.

युवा नेते प्रशांत शिंदे यांच्यासमवेत जवळा गावचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शितल प्रशांत शिंदे, सोनाली राहूल पाटील, रफिकभाई शेख, राधिका मारूती हजारे, भाऊसाहेब महारनवर, मंगल आव्हाड, नंदा कल्याण आव्हाड, हरिदास हजारे, सारिका रोडे, जयश्री कोल्हे या सर्वांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी भव्य सत्कार चौंडी येथे संपन्न झाला.

यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमावेळी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद दादा कार्ले, संचालक सचिन घुमरे, डाॅ गणेश जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, सोमनाथ पाचरणे, डाॅ सुनिल गावडे, तुषार पवार, अनिल गदादे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, बापुराव ढवळे, जवळा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख मुरली अण्णा हजारे, काकासाहेब वाळुंजकर, दशरथ कोल्हे, राहुल पाटील, सोमनाथ वाळुंजकर, तुकाराम भाऊसाहेब हजारे, प्रमोद कोल्हे, एकनाथ हजारे, अनंता लेकुरवाळे, दीपक देवमाने, महेंद्र खेत्रे, सावता हजारे, पांडुरंग रोडे, डॉ ईश्वर हजारे, तानाजी पवार, राहुल मासोळे, अनिल माने, नाना कोल्हे, राष्ट्रपाल आव्हाड सह आदी उपस्थित होते.

चौकट

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्याही पक्षाचं लेबल लावलं नव्हतं, निवडणूक पुर्ण ताकदीने लढवली आणि जिंकली. आता गावाचा विकास करायचा असेल आणि गावाला वेगळेपण द्यायचं असेल तर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. शिंदे साहेब नेहमी काम करताना मोकळीक देतात. यामुळे पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी एकमुखी निर्णय घेत आमदार प्रा.राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज ग्रामपंचायत पदाधिकारी व शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

प्रशांत शिंदे, जवळा ग्रामविकास पॅनल
—————-

चौकट

जवळा गावाच्या विकासासाठी आजवर भरघोस निधी दिला आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाच्या संदर्भात कुठलीही अडचण येऊ देणार नाही. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. प्रशांत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पुन्हा पक्षात प्रवेश केलाय. त्या सर्वांचे पक्षात मनापासून स्वागत. पक्षात आलेल्या सर्वांचा मानसन्मान राखला जाईल. तुमच्या स्वागतालाच 25 लाख रूपयांचा निधी देऊन तुमचा सन्मान केला आहे. जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व नेते कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन व सर्वांचे पक्षात मनापासून स्वागत.

 आमदार प्रा.राम शिंदे

]]>
https://nagaripunch.com/rohit-pawars-big-shock-in-the-constituency-is-the-entry-of-hundreds-of-workers-into-bjp/feed/ 0
नगरीपंचच्या वृत्ताचा दणका;आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी 24 तासात जेरबंद https://nagaripunch.com/nagri-panchs-report-accused-in-crime-leading-to-suicide-jailed-within-24-hours/ https://nagaripunch.com/nagri-panchs-report-accused-in-crime-leading-to-suicide-jailed-within-24-hours/#respond Fri, 10 Nov 2023 02:23:41 +0000 https://nagaripunch.com/?p=4395 नगरीपंच्या वृत्तामुळे पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर….

श्रीगोंदा दि.10 नोव्हेंबर 2023

छळामुळे विवाहितेचा मृत्यू झाला होता या घटनेला पंधरा दिवस उलटून जाऊन ही आरोपींना अटक होत नव्हते,यामुळे संतप्त विवाहितेच्या माहेरच्यांनी
श्रीगोंद्यात कायद्याचे राज्य आहे का? असा सवाल उपस्थित केला होता, याच अनुषंगाने नगरीपंचने आवाज उठवला होता.

याबाबतची माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील वैशाली राहुल दरेकर या 26 वर्षीय विवाहितेने 19 ऑक्टोबरला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. सासरी होणाऱ्या छळाला व वारंवार पैशाच्या मागणीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद मृताचा भाऊ दीपक काकडे (रा. कोंभळी, ता. कर्जत) यांनी दिली होती. श्रीगोंदा पोलिसांनी पती राहुल आश्रु दरेकर, सासरा आश्रु चंद्रकांत दरेकर, सासू मथूरा दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र घटनेला 15 दिवस उलटूनही आरोपींना अटक झाली नव्हती. पोलिस या गुन्ह्याचा तपास करताना टाळाटाळ करत असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी केला होता. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षकांसह गृह मंत्रालय तसेच जिल्हाधिकाऱ्यांही निवेदन पाठविण्यात आले होते.

बहिणीच्या सासरच्यांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली. यापूर्वी घरासाठी दोन लाख दिले असताना आता गाडी घेण्यासाठी तिच्या सासरच्यांना पुन्हा पैसे हवे होते. यापूर्वी दिलेल्या पैशाचे पुरावे पोलिसांना देऊनही पोलिस आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निवेदनात फिर्यादीनी म्हटले होते. शिवाय आरोपींची पोहोच वरपर्यंत असल्याचेही मध्यस्थी सांगत असून प्रकरण मिटविण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप फिर्यादीनी निवेदनात केला होता.

सामान्यांना न्याय मिळत नसेल तर तालुक्यात कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल करत मृताच्या नातेवाईकांनी उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. आरोपी मोकाट असून त्यांच्या जबाबही न नोंदविणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी काकडे कुटुंबियांनी गृह मंत्रालयाकडे केली होती .

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरी पंचने आवाज उठवला होता. नगरीपंचच्या वृत्ताने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली व 24 तासाच्या आत मुख्य आरोपी मृताचा पती राहुल आश्रु दरेकर याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याला काल दुपारी मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संदर्भात नगरीपंचने तपासी अधिकारी पो.उप.नि.झंजाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले लवकरच उर्वरित आरोपींना अटक केली जाईल.

]]>
https://nagaripunch.com/nagri-panchs-report-accused-in-crime-leading-to-suicide-jailed-within-24-hours/feed/ 0
जरांगे पाटील यांचा पुन्हा राज्यभर दौरा, काय असेल पुढची रणनीती…! https://nagaripunch.com/what-will-be-the-next-strategy-of-jarange-patils-tour-across-the-state-again/ https://nagaripunch.com/what-will-be-the-next-strategy-of-jarange-patils-tour-across-the-state-again/#respond Thu, 09 Nov 2023 10:43:27 +0000 https://nagaripunch.com/?p=4389 जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात, गावोगावी घेणार सभा…

अंतरवाली सराटी दि.8 नोव्हेंबर 2023

महाराष्ट्रभरात मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा दौरे करणार आहेत. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना यासंबधीची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घेण्यासाठी ते पुन्हा दौरा सुरू करीत आहे.१५ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबर दौरे करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप देखील सांगितले आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या दौऱ्याबाबतची माहिती दिली आहे.

१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा, १६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी, १७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, १८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड

१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी, २० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण, २१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबकेश्वर,

२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर, २३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.

हा त्यांच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा असणार आहे, तर पुढच्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण राहिलेला मराठवाडा, विदर्भ, कोकण असे ६ टप्प्यात आपण दौरे करणार असल्याची माहिती यावेळी जरांगे यांनी दिली आहे.कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या स्मारकापासून या दौऱ्यांची सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे.

मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या दरम्यान राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे.

या दौऱ्यात जरांगे हे कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

]]>
https://nagaripunch.com/what-will-be-the-next-strategy-of-jarange-patils-tour-across-the-state-again/feed/ 0
बाळासाहेब मुरकुटे,बागेश्वरधाम दरबारी…. https://nagaripunch.com/balasaheb-murkutebageshwardham-darbari/ https://nagaripunch.com/balasaheb-murkutebageshwardham-darbari/#respond Thu, 09 Nov 2023 02:44:37 +0000 https://nagaripunch.com/?p=4380 बागेश्वर धामच्या दरबारी मंत्री,आमदारांची गर्दी…

संभाजीनगर दि.9 नोव्हेंबर 2023

सनातन धर्म आणि हिंदूत्वाची
प्रखर भूमिका मांडणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात भाजपचे मंत्री दररोज हजेरी लावत आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड संयोजक असलेल्या या रामकथा, प्रवचन आणि दरबारामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यातील गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी यापूर्वीच या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यात नुकतेच नेवाशाचे मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नागेश्वर धाम यांचे दर्शन घेतले.

संभाजीनगरात ऐन दिवाळीत आणि लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी आयोजित कार्यक्रमाकडे राजकीय इव्हेंट म्हणूनही बघितले जात आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार त्यांच्या ` परची’ (चिठ्ठी-भविष्यवाणी) साठी ओळखला जातो. सध्याची राज्य आणि देशातील राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येकाला येणाऱ्या निवडणुकीत आपले काय होणार? उमेदवारी मिळणार का? मिळाली तर निवडून येणार का? याची चिंता सतावत आहे.

अशावेळी बागेश्वर धाम यांच्या दरबारात आपली ‘परची’ निघते का? यासाठीही सत्ताधारी मंत्री, आमदारांनी गर्दी केल्याची चर्चा आहे. डॉ. भागवत कराड हे स्वतः प्रत्येकाची ओळख धीरेंद्र शास्त्री यांच्याशी करून देत आहेत. कराड यांच्यासाठी बागेश्वर धामचा दरबार आणि रामकथेचे आयोजन हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेचे आयोजन करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे हेही इच्छुक होते. दोघांनीही मध्य प्रदेशात जाऊन धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेऊन तारीख मिळवण्याचा प्रयत्न केला होता.त्यात कराडांनी बाजी मारली.आणि महिनाभरात सगळी तयारी करून कथेचे आयोजन केले.

सनातन धर्म आणि प्रखर हिंदुत्ववादी विचार धीरेंद्र शास्त्री महाराज आपल्या कथेतून मांडत असल्याने याचा फायदा लोकसभा निवडणुकीत उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने दिग्गज नेते मंडळी सह मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी हजेरी लावली. महाराजांची कृपादृष्टी व्हावी, आपली परची निघावी, यासाठी नेत्यांनी बाबांच्या दरबारात हजेरी लावल्याची चर्चाही या निमित्ताने रंगताना दिसते आहे.

]]>
https://nagaripunch.com/balasaheb-murkutebageshwardham-darbari/feed/ 0
‘त्या’वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराज आज कोर्टात गैरहजर…. https://nagaripunch.com/indurikar-maharaj-absent-in-court-today-regarding-that-controversial-statement/ https://nagaripunch.com/indurikar-maharaj-absent-in-court-today-regarding-that-controversial-statement/#respond Wed, 08 Nov 2023 16:38:53 +0000 https://nagaripunch.com/?p=4370 इंदुरीकर महाराजांना ‘त्या’वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोर्टाकडून दिलासा…

अहमदनगर दि.8 नोव्हेंबर 2023

: इंदुरीकर महाराजांना ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी तात्पुरता दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाची पुढची सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यामुळे दिवाळीच्या काळात इंदुरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.समन्स बजावूनदेखील इंदुरीकर महाराज आजच्या सुनावणीला अनुपस्थित होते. संगमनेर कनिष्ठ न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे. इंदुरीकर महाराजांच्या वतीने वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता जामीन घेण्यासाठी इंदुरीकर महाराज न्यायालयात येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

इंदुरीकर महाराजांनी 2020 साली एका किर्तनात अपत्यप्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 2020 साली दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण अंधश्रद्धा निर्मूलन समीती आणि राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला होता. तोच आदेश सुप्रिम कोर्टानेही कायम ठेवल्याने इंदुरीकर महाराजां विरोधात संगमनेर कोर्टात हा खटला नव्याने सुरू झाला आहे. गेल्या महिन्यात कोर्टाने समन्स बजावले होते. मात्र इंदुरीकर महाराज भेटले नाही असा रिपोर्ट पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आला होता. या प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी झाली, पण आजही इंदुरीकर

महाराज सुनावणीसाठी हजर राहिले नाहीत.काय आहे ते वादग्रस्त वक्तव्य ?

एका कीर्तनात इंदुरीकर म्हणाले होते, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. “याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला, त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. तर

हिरण्यकश्यपूनं नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.” यानंतर इंदुरीकरांचं हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान कायद्याचं उल्लंघन आहे, अशी टीका त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती.

]]>
https://nagaripunch.com/indurikar-maharaj-absent-in-court-today-regarding-that-controversial-statement/feed/ 0
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, दहा जणांवर गुन्हे दाखल https://nagaripunch.com/blockade-in-various-places-in-the-city-in-the-wake-of-diwali-criminal-charges-have-been-filed-against-10-people/ https://nagaripunch.com/blockade-in-various-places-in-the-city-in-the-wake-of-diwali-criminal-charges-have-been-filed-against-10-people/#respond Wed, 08 Nov 2023 13:31:06 +0000 https://nagaripunch.com/?p=4367 बसस्थानक परिसरात टवाळखोरांवर कोतवाली पोलिसांची कारवाई

अहमदनगर दि.8 नोव्हेंबर 2023

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजार, बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात मद्यपान करून वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यासोबतच मुख्य चौकांमध्ये कोतवाली पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत असून वाहनधारकांची चौकशी केली जात आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ६ आणि ४ टवाळखोरांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन राजेंद्र नायक (वय 22 वर्ष, रा. नेहरूनगर भिंगार,अहमदनगर), दर्शन किरण शहाणे (वय 21 वर्ष, रा.भिंगार ब्राह्मण गल्ली, अहनदनगर),
महादेव म्हातारदेव गोल्हार (वय 35 रा.करोडी, ता.पाथर्डी, जिल्हा अहमदनगर), संतोष लिंबाजी आभाळे (वय ४१ रा.आभाळवाडी, ता. संगमनेर , जि. अहमदनगर), रामेश्वर भरत गणेशकर (वय 23 वर्ष, रा.दरेवाडी अहमदनगर), लक्ष्मण पांडुरंग मोटे (वय 38 वर्ष, रा. नेप्ती बायपास रोड, अहमदनगर) या सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळामध्ये गर्दीच्या ठिकाणी मद्यपान करून सर्व सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच मद्यपान करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. चारचाकी, दुचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस जवान शरद वाघ सागर पालवे गणेश धोत्रे योगेश भिंगारदिवे सतीश भांड सोमनाथ मुरकुटे श्रीकांत खताडे यांनी केली.

]]>
https://nagaripunch.com/blockade-in-various-places-in-the-city-in-the-wake-of-diwali-criminal-charges-have-been-filed-against-10-people/feed/ 0
हक्काच्या पाण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी फुंकले रणशिंग ! https://nagaripunch.com/mla-prajakta-tanpure-blew-the-trumpet-for-the-right-to-water/ https://nagaripunch.com/mla-prajakta-tanpure-blew-the-trumpet-for-the-right-to-water/#respond Tue, 07 Nov 2023 16:29:36 +0000 https://nagaripunch.com/?p=4361 पाणीप्रश्ना संदर्भात आ.तनपुरे यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन

राहुरी दि.7 नोव्हेंबर 2023

माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त
तनपुरे (शरद पवार गट) हे जायकवाडीला पाणी सोडण्याच्या आदेशावरून आक्रमक झाले आहेत. ‘समन्यायी पाणी वाटप कायदा मुळा धरणाच्या मुळावर उठला असून, या कायद्याचे पुनर्विलोकन करावे. जायकवाडी पाणी देणे म्हणजे पाण्याचा अपव्यय आहे. आमच्या हक्काचे पाणी जायकवाडीद्वारे अनधिकृत पाणीउपसा करणारे आणि दारूच्या कारखान्यांना वापरले जाणार आहे. हा निर्णय रद्द करावा. यासाठी तीव्र आंदोलन करू’, असा इशारा आमदार तनपुरे यांनी दिला आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला नगर जिल्ह्यातून विरोध आहे. यातून राजकीय संघर्ष पेटू पाहत आहे. अकोले, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासे येथून पाणी सोडण्याच्या आदेशाला विरोध सुरू आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मात्र अजून भूमिका स्पष्ट केली नव्हती. यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी चर्चा होती. मात्र, आमदार तनपुरे यांनी आज राहुरी येथील तहसीलदार चंद्रजीत राजपूत, मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले.श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मुळा पाटबंधारेचे उपअभियंता विलास पाटील, बाबासाहेब भिटे, विलास शिरसाठ, आदिनाथ तनपुरे, दिलीप इंगळे, विजय कातोरे, आप्पासाहेब ढूस, बाळासाहेब खुळे उपस्थित होते.

आ.तनपुरे यांनी या वेळी समन्यायी कायद्यावर विषमन्यायी अशी टीका केली. आमदार तनपुरे म्हणाले, “नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. राहुरी तालुक्यात यंदा सरासरीच्या 50 टक्केच पाऊस झाला आहे. दुष्काळाच्या झळा आता बसू लागल्याने टँकरची मागणी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत मुळा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडणे म्हणजे, 50 टक्के पाण्याची नासाडी करणे आहे. याचा फटका राहुरीसह नगर जिल्ह्याला बसणार आहे.””जायकवाडीचे आठ, तर मुळा धरणातून तीन आवर्तन होतात. जायकवाडीतून रब्बीचे दुसरे आवर्तन सुरू आहे. मुळा धरणातून रब्बीच्या पहिल्या आवर्तनाचे नियोजन अद्याप नाही. जायकवाडीच्या बॅक वॉटरमध्ये हजारो अनधिकृत विद्युत पंप आकडे टाकून तीन-चार टीएमसी पाणी उपसा करीत आहेत. आमच्या हक्काचे पाणी जायकवाडीच्या अनधिकृत पाणीउपसा व दारूच्या कारखान्यांना वापरले जाणार आहे. यामुळे समन्यायी पाणीवाटपाची तत्त्वं येथे लागू होत नाहीत. शेतकऱ्यांची भावना भावनाहीन सरकारला पोहोचविण्याचे काम केले आहे. आज (मंगळवारी) या प्रश्नावरील याचिकेवर सुनावणी आहे. यावर जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही तनपुरे यांनी दिला.

]]>
https://nagaripunch.com/mla-prajakta-tanpure-blew-the-trumpet-for-the-right-to-water/feed/ 0
वडगाव गुप्ता येथील नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांनी घेतली खा.सुजय विखे यांची भेट https://nagaripunch.com/newly-elected-sarpanch-of-vadgaon-gupta-along-with-members-met-kha-sujay-vikhe/ https://nagaripunch.com/newly-elected-sarpanch-of-vadgaon-gupta-along-with-members-met-kha-sujay-vikhe/#respond Tue, 07 Nov 2023 12:13:25 +0000 https://nagaripunch.com/?p=4357 वडगाव गुप्ता गावासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही :खा.विखे 

नगर दि.7 नोव्हेंबर 2023

काल वडगाव गुप्ता ता. नगर येथील नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांची भेट घेतली.

वडगाव गुप्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून गावात खा. सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले भाजप प्रणित समृद्धी ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयाचा जल्लोष साजरा करत निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन आनंद साजरा केला.

दरम्यान खा. विखे यांनी नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा अतिशय उत्साहात सत्कार केला व त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देऊन गावाचा विकास साध्य करण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच सोनुबाई विजय शेवाळे, सदस्य बाळासाहेब गंगाधर डोंगरे, आशाबाई दत्तात्रय शेवाळे, बाळू धोंडीराम शिंदे, विजय मुरलीधर शेवाळे, ज्ञानदा शिवाजी घाडगे, डोंगरे उमेश अशोक, सुवर्णा दत्तात्रय आंबेडकर, योगेश मच्छिंद्र निकम, सुनिता बाबासाहेब गव्हाणे, मिराबाई रावसाहेब डोंगरे, हूसेन गुलाब सय्यद, जिजाबाई प्रल्हाद डोंगरे, मिराबाई राजेंद्र शेवाळे आदी विजयी उमेदवार उपस्थित होते.

खा. सुजय विखे यावेळी म्हणाले की, वडगाव गुप्ता या गावासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. जी विकासाची वाटचाल सध्या सुरू आहे ती अशीच निरंतर चालू राहील असा विश्वास व्यक्त केला.

तसेच सर्व विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना खासदार सुजय विखेंनी स्पष्ट केले की, जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थकी लावून जनतेच्या विविध अडचणी समजून घेण्याचे काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे व जनतेचे सेवक म्हणून प्रामाणिक काम आपल्या माध्यमातून घडावे. असे मत मांडत त्यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला आणि विजयाचा उत्साह द्विगुणित केला.

याप्रसंगी जालिंदर डोंगरे, शामराव पिंपळे, भिमराज गव्हाणे, बाळासाहेब डोंगरे, एकनाथ मोरे, नारायण शिंदे, बाबासाहेब गव्हाणे, हरीभाऊ शेवाळे, रामबाबा शेवाळे, डाॅ. बापु पवार, भिमराज डोंगरे, बापु गव्हाणे, बाळू गव्हाणे, सुजित डोंगरे, पुजा डोंगरे, अशोक शेवाळे, विकास शेवाळे, अनिल शेवाळे, अशोक आंबेडकर, दत्तात्रय शेवाळे, रावसाहेब घाडगे, शिवाजी घाडगे, गोरक्षनाथ शेवाळे, देवीदास डोंगरे, रंगनाथ गिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

]]>
https://nagaripunch.com/newly-elected-sarpanch-of-vadgaon-gupta-along-with-members-met-kha-sujay-vikhe/feed/ 0
मोबाईल मधून पैशांची चोरी थांबवा – पो.निरीक्षक चंद्रशेखर यादव https://nagaripunch.com/stop-theft-of-money-from-mobile-phones-inspector-chandrasekhar-yadav/ https://nagaripunch.com/stop-theft-of-money-from-mobile-phones-inspector-chandrasekhar-yadav/#respond Tue, 07 Nov 2023 11:10:35 +0000 https://nagaripunch.com/?p=4353 सायबर सुरक्षितेसाठी कोतवाली पोलिसांकडून जनजागृती, व्यापारी व नागरिकांना 10,000प्रति पोस्टरचे होणार वाटप

अहमदनगर दि.7 नोव्हेंबर 2023

नगर – वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोतवाली पोलिसांकडून पोस्टर्सचे वाटप केले जात आहे. कापड बाजारातील व्यापाऱ्यांच्या मीटिंग वेळी सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपली फसवणूक होऊ नये, यासाठी मोबाईल हाताळताना सतर्क राहणे गरजेचे असल्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी यावेळी सांगितले.

दिवाळीचे पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी, नागरिकांना चोरी आणि फसवणूक टाळण्यासाठी व खबरदारी घेण्यासाठी कोतवाली चे पोलीस निरीक्षक यादव यांनी मीटिंग घेतली. यावेळी इतर सूचना देत पोस्टर्सचे वाटपची सुरुवात करण्यात आली.
नागरिकांकडून सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाईलचा वाढलेला वापर तसेच ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण यातून सायबर गुन्हे घडत आहेत. काही वेळा सायबर चोरांकडून होत असलेल्या फसवणुकीची कल्पना येत नाही व मोठी फसवणूक होते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या क्रमांकावर आलेली मेल किंवा लिंकवर लगेच क्लिक करु नये, कोणतेही लोन ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नये, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत ओळख वाढवू नये, कोणालाली बॅंकची वैयक्तीक माहिती शेअर करु नये, अशा काही सूचना पो.निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केल्या आहेत. दिवाळीमुळे कापड बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना सायबर जनजागृतीबाबत पोस्टर्स वाटप केले जात आहेत. अशा १०,००० प्रती छापण्यात आल्या असून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

सदर मीटिंगवेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर सेक्रेटरी किरण व्होरा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा संभव काठेड सतीश मुथा दीपक नवलांनी रवी गांधी देवेंद्र भट्टेजा रवि किथानि ऋषि येवलेकर, योगेश गांधी चंद्रकांत चोपडा इतर व्यापारी उपस्थित होते.
………………….
याबाबत घ्या काळजी
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यायची काळजी आदी बाबींवर पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. मोबाइलचा वापर अनावश्यक अपलोड किंवा डाउनलोडसाठी करू नये, आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही सांगू नये, फसव्या मेलपासून सावध राहावे, अशी माहिती कोतवाली पोलिसांकडून देण्यात येत आहे.
………………….
फसवणूक झाल्यास तत्काळ संपर्क करा
ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तत्काळ बॅंकेशी संपर्क करुन अकाऊंट बंद करावे तसेच डेबिट फ्रीज करावे. फसवणूक झाल्याची माहिती सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

]]>
https://nagaripunch.com/stop-theft-of-money-from-mobile-phones-inspector-chandrasekhar-yadav/feed/ 0