कोतवाली पोलिसांची कामगिरी… तीन गुन्हे दाखल सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर दि.19 नोव्हेंबर 2023
कायनेटीक चौक ते नगर कॉलेज रोडवरून गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो कोतवाली पोलिसांनी पकडला असून त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच झेंडीगेट परिसरात पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोहेल जावेद कुरेशी (रा.आर.आर बेकरीजवळ, झेंडीगेट) सोफीयान आयाज कुरेशी (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) मोजीब म्हारुब पठाण (रा.
कोठला, घास गल्ली, अहमदनगर) या तीन आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील झेंडीगेट परिसरातील बुढण मज्जिद व कारी मज्जिद जवळ पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी छापा टाकून सोहेल जावेद कुरेशी व सोफीयान आयाज कुरेशी या दोघांना ताब्यात घेतले. सुमारे १७० किलो गोमांस, दोन सत्तुर व वजनकाटा असा ३७ हजार ५५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई कायनेटीक चौक ते नगर कॉलेज रोडवर करण्यात आली. पाच गोवंशीय जनावरे कत्तली करण्याकरीता घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोसह चालक मोजीब पठाण याला ताब्यात घेण्यात आले आहे. तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए पी इनामदार, सलिम शेख, अभय कदम, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे यांनी ही कारवाई केली आहे.