Saturday, April 19, 2025

छगन भुजबळ पुन्हा अडचणी? अंजली दमानिया यांची हायकोर्टात धाव…

नाशिक दि.09 ऑक्टोबर 2023

भुजबळासंबंधित संस्थांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

छगन भुजबळ यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता असून सामाजिक कार्यकत्यां अंजली दमानियांनी भुजबळांच्या विरोधात आता कोर्टात धाव घेतली आहे.

भुजबळां संबंधित संस्थांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे. त्याचबरोबर शासनाने फेरविचार करण्याचा जीआर काढण्यात आला होता, त्याच काय झालं असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित करत कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

एकीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिंदे भाजप सरकारसोबत सत्तेत सामील झाले. यात छगन भुजबळ यांनी देखील अजितदादांसोबत सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळालेल्या छगन भुजबळ यांच्या पाठीमागे हा ससेमिरा पुन्हा लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना क्लिन चिट कशी, याबाबत अंजली दमानियां यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या