विखेंवरील नाराजगी की आणखी काही प्लॅनिंग? पहा.
शिर्डी दि.27 एप्रिल 2024
लोकसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्षीयांनी कंबर कसली, परंतु सध्या पक्षातील नाराज लोकांची नाराजगी काढण्यासाठी पक्ष श्रेष्ठींना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर अहमदनगर जिल्ह्यात विखे विरोधक एकवटल्याचे चित्र निर्माण झाले होते.
पक्षश्रेष्ठींनी या सर्व गोष्टींवर तोडगा काढल्याचे दिसले.
परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील एका मातब्बर नेत्यावर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. ते म्हणजे माजी आ. स्नेहलता कोल्हे. त्या खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात सहभागी होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान त्यावरून आता त्यांची काय नाराजगी आहे किंवा त्यांना पुन्हा सक्रिय करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोबत चर्चा केल्याची चर्चा रंगली आहे.
सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीत कोल्हे यांची भेट घेत चर्चा केली आहे. परंतु असे होऊनही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आगामी निर्णय होईल असे कोल्हे म्हणाल्या.
विखेंवरील नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न?
माजी आ. स्नेहलता कोल्हे या पालकमंत्री राधाकृष्ण विखेंवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. विवेक कोल्हे यांनी उघडउघड विरोध केल्याचे पाहायला मिळाले. नाराजगीमुळेच महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात त्या आलेल्या दिसल्या नाहीत.
याच अनुशंघाने मुख्यमंत्री शिंदे व माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची शिर्डीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. परंतु ही बैठक झाल्यानंतर त्यांनी काही प्रश्न उत्तरे देताना जे वक्तव्य केले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.
त्या म्हणाल्या ‘आमची नाराजी राधाकृष्ण विखेंवर नसून पालकमंत्री म्हणून विकास निधी, रस्त्याची कामे आदी काही मुद्दे होते त्या बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आमच्या कर्यकर्त्यांची चर्चा होईल. पक्षांतर्गत आमच्यावर अन्याय झाला असून याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही चर्चा केली जाणार असल्याचे कोल्हे यांनी म्हटले.
दरम्यान आता शिंदे-कोल्हे अशी चर्चा होऊनही विखेंवरील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय कार्यकर्ते घेतील असे कोल्हे यांनी म्हटल्याने त्यांच्या आगामी राजकीय डावपेचाकडे लक्ष लागले आहे.