ताज्या बातम्यावीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक त्रस्त

वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक त्रस्त

spot_img
spot_img

वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक त्रस्त

श्रीगोंदा दि.17 एप्रिल 2025

श्रीगोंदा शहरातील हेलिपॅड व लक्ष्मी नगरच्या काही भागात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीकडून याची कसलीच दखल घेण्यात येत नाही.त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहरातील नागरिक वेळेवर वीज बिलाचा भरणा करतात. बिलाला उशीर झाल्यास कंपनीचे वायरमन लगेचच वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देतात. मग, वीज गायब झाल्यानंतर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तोंडे का लपवतात, असा सवाल रहिवाशी करत आहेत.

या भागातील नागरिक आधीच गर्मीने हैरान झालेले आहेत. त्यात वीज गायब होत असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वीजपुरवठा खंडीत का होतो, याबाबत महावितरण कंपनीच्या शहर अभियंता कावरे यांना विचारले असता, त्यांनी मी सुट्टी वर असल्याचे उत्तर नगरीपंचशी बोलताना सांगितले.

काही भागात तर विद्युत वाहिन्यांच्या कमी-अधिक व्होल्टेजमुळे विद्युत उपकरणांचे नुकसानही झाले आहे. मात्र, महावितरण कंपनीला या प्रकाराशी काही देणे-घेणे नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

लक्ष्मीनगर व हेलिपॅड भागात गेल्या सहा महिन्यांपासून अनियमित वीजपुरवठ्याचा त्रास रहिवाशी सहन करत आहेत. या परिसरात विद्युत पुरवठा बंद झाल्यावर डासांच्या उपद्रवाला रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे असे नागरिक सांगतात.

लक्ष्मीनगर परिसरात अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सायंकाळी तसेच रात्री वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत.वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरातील उपकरणे चालवण्यासाठी साधन राहत नाही. पाण्याचा प्रवाह कमी असून त्यासाठी मोटर चालवणेदेखील मुश्कील होत असते. प्रशासनाने याची दाखल घ्यावी.

चौकट

अनेक वेळा संध्याकाळी लाईट गेल्या नंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपर्क केला असता फोन घेतला जात नाही व चुकून घेतला तर आमची सुट्टी झाली आहे.सकाळी कामावर आल्यावर पाहतो असे उत्तर दिले जाते. त्यामुळे नागरिकांना 12/16 तास हा त्रास सहन करावा लागतो.

लेटेस्ट न्यूज़