ताज्या बातम्यासव्वा तपानंतर नगर महसूलला विजेतेपद

सव्वा तपानंतर नगर महसूलला विजेतेपद

spot_img
spot_img

नाशिक महसूल विभागीय क्रिकेट स्पर्धा, नागपूरच्या मैदानावर बोलबाला

अहमदनगर दि.4 मार्च 2024

जळगाव येथे आयोजित विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय क्रिकेट संघाचा पराभव करून एकहाती विजय मिळवला.

नाशिक संघाने 15 over मध्ये सर्वबाद 93 धावा केल्या होत्या प्रत्युत्तरादाखल नगर संघाने अवघ्या 12 over मध्ये 4 खेळाडूंच्या बदल्यात 94 धावा करून सहज विजय प्राप्त केला. धावांचा पाठलाग करताना अमोल मंडलिक यांनी 39 धावा आणि कर्णधार हेमंत ढोकले यांनी नाबाद 25 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

संपूर्ण स्पर्धेत नगर संघाने धुळे, जळगाव आणि नाशिक संघाचा एकहाती पराभव करून नगर जिल्ह्याला जेतेपद मिळवून दिले. स्पर्धेदरम्यान अमोल मंडलिक, सागर भापकर आणि विजय  भोईर यांचा अष्टपैलू खेळ आणि कर्णधार हेमंत ढोकले यांची फलंदाजीच्या जोरावर नगर संघाने विभागीय स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.पारितोषिक- विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे साहेब यांच्या हस्ते दिले गेले.

संघ

हेमंत ढोकले(कर्णधार), पद्माकर गायकवाड(उपकर्णधार), अमोल मंडलिक,पांडुरंग कोतकर,सागर भापकर,विजय भोइर,अमोल आंबरे,योगेश तांगडे,राहुल कोळेकर,युवराज जारवाल,विजय चव्हाण,आकाश काशिकेदार,अंबादास नवगिरे,सचिन शिंदेसंघ प्रशिक्षक- श्रीगोंदा पारनेर प्रांत श्री गणेश राठोड सरमार्गदर्शन- मा जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ सर , अप्पर जिल्हाधिकारी श्री मापारी सर व अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर सर

लेटेस्ट न्यूज़