ताज्या बातम्यादादा आम्हाला जीव लावा, आम्ही भाजपला...!

दादा आम्हाला जीव लावा, आम्ही भाजपला…!

spot_img
spot_img

अहमदनगर मधील भाजपच्या शिलेदारांचा अजित पवार गटात प्रवेश

कोपरगाव दि.6 एप्रिल 2024

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणूकीचे वारे जसजसे जोरात वाहू लागले तसतसे आता राजकीय घडामोडींना वेग यायला सुरवात झाली आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघात जशा घडामोडी घड्तायेत तशाच घडामोडी आता उत्तरेतही घडू लागल्या आहेत.

 

आता भाजपच्या शिलेदारांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने कोपरगाव मध्ये भाजपला खिंडार पडले आहे. भाजपचे विवेक कोल्हे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे स्वप्निल निखाडे, भाजपच्या माजी नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी नगरसेविका मंगल आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव हे कोल्हे गटाच्या जवळचे. त्यांनीच भाजपाला अर्थात कोल्हे गटाला राम राम करत आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

ओम आढाव, माजी नगरसेविका शोभाताई उल्हास पवार यांचे चिरंजीव सुरज बापू पवार, हृषीकेश आढाव, नवनाथ बढे, बाबासाहेब पगारे आदी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यावर आमदार आशुतोष काळे यांनी सर्वांचा पुष्पगुच्छ दिले.

दादा आम्हाला जीव लावा…

अजित दाद गटात प्रवेश केल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे प्रतिक्रिया देताना म्हणाले, आजचा दिवस गोड आहे आणि मी त्यामुळे कोणावरही भाष्य करणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने काम करणार आहे. आम्ही जिथे होतो तिथे अस्सल काम केलं आणि आता दादांसोबत येऊन प्रामाणिकपणे काम करू, पण दादा, तुम्ही आम्हाला जीव लावा असे निखाडे यावेळी म्हणाले.

उत्तरेत आणखी घडामोडींची शक्यता

उत्तरेत आणखी काही घडामोडी घडण्याची श्यक्य वर्वतली जात आहे. महायुती व महाविकास आघाडी झाल्यामुळे अनेक कट्टर राजकीय शत्रुत्व असणाऱ्यांना एकत्र यावे लागत आहे. परंतु त्यांना जुळवून घेणे सध्या जड जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात नाराज झालेले बंडखोर विविध पक्षात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उत्तरेत आणखी घडामोडींची शक्यता वर्तवली जात आहे.

 

लेटेस्ट न्यूज़