Wednesday, December 18, 2024

युवा प्रशिक्षणार्थीना सेवेत कायम करण्याची मागणी

बेरोजगारीचे संकट-आमदार मोनिका राजळे यांना दिले निवेदन :

शेवगाव दि. 15 डिसेंबर 2024

तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात शासकीय कामाकाजाचे प्रशिक्षण घेत मानधन तत्वावर सेवा देणाऱ्या मुख्यमंत्री तालुका युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने विविध समस्या व मागण्या संदर्भात आमदार मोनिका राजळे यांच्याशी चर्चा करीत निवेदन देण्यात आले. मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीना काही मोजक्या कालावधीकरिता शासकीय कार्यालयात सेवा बजावण्याची संधी देण्यात आली आहे. नंतर त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे सेवा कालावधी वाढविण्यात यावा. भविष्यात होणाऱ्या सरळ सेवा भरतीत त्यांना प्राधान्य देण्यात यावे, त्यांचे कायमस्वरूपी समायोजन होईपर्यंत ते जिथे सद्या कार्यरत आहेत तिथेच कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा कायम करण्यात यावी. त्यांना शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आकस्मिक रजा, वैद्यकीय रजा, प्रवास भत्ता तसेच वेतन अदा करण्यात यावे.

निवेदन देताना संघटनेचे प्रशिक्षणार्थ कर्मचारी नेहा जाधव,भवर सिद्धी,ऋतुजा खंडागळे,अश्विनी गुजार सायली भराड,स्वाती सुतार, शितल राऊत,कांचन सगळे,राऊत शितल संदीप ,राजेंद्र अभंग, रवींद्र बोरूडे,किशोर धोतरे,सुरेश मुंढे,सोमेश्वर फलके,चक्रधर खांबट,आल्हाट पिटर,आघाव योगेश,डोंगरे दिपक आधी हजर होते.

केवळ सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली आहे. सहा महिन्यांचा कालावधी संपत आला असल्याने या युवकांवर बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या