ताज्या बातम्याविकास कामांच्या डोंगरानंतरही पराभव अन् सुजय विखेंचा "काकस्पर्श"

विकास कामांच्या डोंगरानंतरही पराभव अन् सुजय विखेंचा “काकस्पर्श”

spot_img
spot_img

खासदारांनी खरंच दहाव्या- तेराव्याला जावं का..? नेमकं चुकतं कुणाचं, नेते की मायबाप जनतेचं?

श्रीगोंदा दि.16 जुलै 2024

आमदारांप्रमाणे पूर्वी खासदारांना निधी नव्हता. पण, खासदारांनाही विकास निधी असावा यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ नाईक यांनी लढा दिला. तो यशस्वीही झाला कायदेमंडळात काम करणाऱ्या खासदारांना निधी देऊ नये. गटारी बांधणे, रस्ते करणे हे खासदाराचे काम नाही, असे त्यांचे मत होते. पण, न्यायालयीन लढाई रामभाऊंनी जिंकली. खासदारांना प्रारंभी एक कोटीचा निधी होता. तो आज पाच कोटी झाला आहे. खासदारांचे काम काय असते आणि त्यांनी नेमके काय करायला हवे, हे महत्त्वाचे आहे.

 

तर हे सर्व सांगण्याचे नेमके कारण काय याच विषयाचे आमचे मुद्देसूद विश्लेषण

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. या पराभवाच्या कारणांचा त्यांनी शोध घेतलेला दिसतो. फोन उचलत नाहीत. भेटत नाही. वैयक्तिक समारंभात जात नाहीत. सत्यनारायणाची पूजा, दशक्रिया विधीला उपस्थित नसतात, असे त्यांच्या टिकाकारांना आणि मतदारसंघातील काही मंडळींंना वाटत होते. आणि याच गोष्टीमुळे त्यांचा पराभव झाला असे अनेकांचे म्हणणे होते.आणि पराभवानंतर कुठलाही उमेदवार पराभवाचे आत्मपरिक्षण करू लागतो. किंवा ते कारणे शोधावी लागतात. ते प्रत्येक पराभूत उमेदवार करीत असतो. विखे पाटील यांनीही ते केलेले दिसते.आणि त्याचच उदाहरण देत असताना ते लोकांना नेमकं काय पाहिजे हे सांगत असताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटल आहे इथून पुढे लोकांना जे आवडते तेच करायची विकास कामापेक्षा लोकांना त्यांच्यामध्ये गेलेलं जास्त आवडतं त्यामुळे मला’दहावा असेल तर सांगा कावळ्याच्या आधी पोहोचतो ‘असे बोलले परंतु सुजय विखे असे का म्हणाले? या बोलण्यामागचा उद्देश कोणीही समजून न घेता अनेक प्रसार माध्यमाने हा विषय उचलून धरला आणि नेहमीच प्रमाणे विकास कामात पुढे असणारे विखे या वाक्यामुळे पुन्हा ट्रोल झाले. आणि या विषयाची निगेटिव्ह पसरवणे विरोधकांनी सोडले नाही व सर्व सामान्यांन मध्ये वेगळ्या प्रकारचा मेसेज पोहोचवण्यात आला.

डॉ. सुजय विखे पाटील सार्वजनिक जीवनात आहेत. त्यामुळे त्यांनी कुठे उपस्थित राहायचे आणि कुठे नाही हा त्यांचा प्रश्‍न आहे. पण, मुद्दा असा येतो की खासदाराचे नेमके काम काय ?

खरंतर बस थांबे बांधणे हे काम खासदाराचे नाही, पण आपल्याकडे नगरसेवकांची कामे देखील खासदार त्याच्या निधीमधून करत असतो. आणि जनतेचीही अशीच अपेक्षा असते की तो लोकप्रतिनिधी असला तर त्याने आपला घराच्या शेजारच्या रस्ता साफ करण्यापासून ते परराष्ट्र धोरण ठरवण्यापर्यंत सर्व कामे करायला हवीत.

 

स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडवणे खासदाराचे काम नाही मुळात हाच आक्षेप नवनीतभाईंना होता. केंद्र पातळीवर धोरण ठरवणे, धोरणाच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणे हे खासदाराचे काम आहे. एखादा कायदा आपल्या मतदार संघासाठी आवश्यक किंवा जाचक वाटत असल्यास सूचना करणे किंवा अस्तित्वात कायद्यात दुरुस्त्या सुचवणे. त्या दृष्टीने लोकसभेत विधेयक मांडणे ही खासदाराची कामे आहेत.

 

वास्तविक खासदारांनी लोकांना भेटले पाहिजे. छोटेमोटे दौरे करावेत. मतदारसंघाला नेमके काय हवे यासाठी ते प्रयत्नशील असले पाहिजेत. पण, आजकाल असे झाले आहे, की प्रत्येकाला असे वाटते की खासदारांनी भेटले पाहिजे. सेल्फी काढावी. वाढदिवस, लग्नकार्य, दशक्रियाविधीला उपस्थित राहावे आदी अपेक्षा असतात. मात्र लोकांनीही अशाप्रकारच्या अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. सार्वजनिक हिताच्या कामांना महत्त्व खासदारांनी द्यावे की वैयक्तिक याचाही विचार व्हायला हवा. जी कामे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींची आहेत. ती कामे खासदारांनी करावी का हा ही प्रश्न आहे.

 

दुसरे महत्त्वाचे असे की कितीतरी लोकप्रतिनिधी असे आहेत की त्यांना विकासाशी देणघेणं नसते. कामे होत राहातात असे त्यांना वाटते. त्यांना मिरवायला आवडते. कुठे सेल्फी काढ, मयतीला हजर राहा, भांडण मारामाऱ्या सोडव, पोलिस स्टेशनला जा, तसेच छोटेमोठे कार्यक्रम न सोडणे, नौटंकी नेते लोकांना भुरळ घालतात. त्यांचा उदोउदोही होतो. पण, अशा लोकप्रतिनिधींमुळे मतदारसंघाचा विकास होत नाही. सरकारी योजना येत नाहीत. केवळ भावनिक राजकारण करून काही साध्य होत नाही. काही वर्षानी लक्षात येते की मतदारसंघाचा चेहराच काळवंडलेला राहातो. विकासाची बोंब असते. वेळ गेल्यावर शहाणपण येते.

आमदार, खासदार आणि स्थानिक स्वराज्यमधील लोकप्रतिनिधींची कामे काय आहेत हे जाणून घेतले जात नाही. जिल्हा परिषद सदस्याची कामेही खासदारांनी करावी, त्यानेच वैयक्तिक प्रश्‍न सोडवावे ही अपेक्षा ठेवणे गैर आहे. खासदाराचे नेमके काम काय ? हे मुळात लक्षात घेण्याची गरज आहे. परंतु आज काल आमदार खासदार आपल्या कार्यक्रमाला आला तरच तो प्रतिनिधी चांगला आहे अशी म्हणण्याची जणू प्रथाच पडली आहे.

 

चहापेक्षा किटली गरम 

खासदार मतदारसंघात दररोज भेटतीलच असे नाही. पण, त्यांची टीम किंवा पीए नेहमीच दक्ष असायला हवेत का नको याचाही विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा मतदारसंघात काय सुरू आहे. दैनदिन घडामोडीकडे लक्ष हवे. छोट्यामोठ्या गोष्टींची माहिती खासदारांना देणे आवश्‍यक असते. कोणाचा फोन आहे. समोरची व्यक्ती कोण आहे हे सांगण्याची जबाबदारी त्यांची असते. पण, अनेकदा हे पीए म्हणजे ‘चहापेक्षा किटली गरम’ अशा पद्धतीने वागतात आणि त्याचा फटकाही लोकप्रतिनिधींना बसतो. त्यामुळे या त्यांच्या प्रतिनिधीकडेही आमदार खासदारांनी लक्ष देऊन दैनंदिन माहिती घ्यायला हवी.

 

माजी खासदार सुजय विखे यांनी गेल्या पाच वर्षात नगर दक्षिण मध्ये अनेक प्रकारचे विकास कामे केले परंतु तरीही नगर दक्षिणच्या जनतेने त्यांना नाकारले. याचे आत्म परीक्षण करत असताना त्यांना असे जाणवले की लोकांना विकासकामांपेक्षा त्यांच्यामध्ये गेलेले त्यांच्या कार्यक्रमाला गेलेले जास्त आवडते आणि याच गोष्टीमुळे आपला पराभव झाला या हेतूने त्यांनी एका पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या विधानाची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चा झाली.

 

लेटेस्ट न्यूज़