ताज्या बातम्यामुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यादेखत पळवला गेला; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यादेखत पळवला गेला; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

spot_img
spot_img

रोहित पवारांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला

कर्जत दि.17 डिसेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केले. सुरत शहराच्या वैभवात आणखी एका हिऱ्याची भर पडली आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले आहेत.

यावरुन आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते आज सुरतमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या ‘डायमंड बोर्स’चं उद्घाटन झालं. याबद्दल गुजरात सरकारचं अभिनंदन करावं की मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यादेखत पळवला गेला याचं दुःख व्यक्त करावं हेच समजेनासं झालंय.

मुंबईतला हिरे व्यवसाय संपवून सुरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जात असताना आपले सत्ताधारी आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेत राहिले. खुर्चीचा विषय असला तर दिल्लीला पन्नास चकरा मारता, दिल्लीचे पाय धरता आणि महाराष्ट्राच्या हिताचा विषय असतो तेव्हा मात्र बिळात लपून बसता, हाच का तुमचा मराठी बाणा आणि हाच का तुमचा स्वाभिमान, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

भाजपसाठी आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांसाठी केवळ सत्ता महत्वाची आहे का? महाराष्ट्राच्या अस्मितेची तुमच्या लेखी काही किंमत नाही का? अजून काय काय गहाण टाकणार? किमान महाराष्ट्रासाठी थोडा तरी स्वाभिमान दाखवा, अशी टीकाही रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

 

लेटेस्ट न्यूज़