‘त्या’ आंदोलनातही डाँ. प्रणोतींचीच चर्चा
—
महिला सन्मान कागदावरच का… , डाँ. प्रणोती माई जगताप
श्रीगोंदा तालुक्यात रणरागिनी म्हणून नवी ओळख निर्माण करणाऱ्या डाँ. प्रणोती माई जगताप महिला प्रश्नांसाठी पुन्हा आक्रमक दिसल्या. काल लिंपणगाव ग्रामस्थ व महिलांच्या आंदोलनाला पाठींबा देताना त्यांनी अभ्यास पूर्ण भाषणातून सरकारी यंत्रणेवर ताशेरे ओढले.
लिंपणगाव ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात काल तेथील महिला व ग्रामस्थांनी थेट श्रीगोंदा गाठत उपोषण केले. महिलांचा आदर न करणे, कामाबाबत टाळाटाळ करणे, ग्रामपंचायतीत हजर नसणे असे गंभीर आरोप या महिलांनी तेथील ग्रामसेवकावर केले. या महिलांच्या उपोषणाला डाँ. प्रणोती माई जगताप यांनी पाठीबा दिला. एकीकडे सरकार महिलांना समान, हक्क देण्याची भाषा करत असताना महिलांना त्यांच्या मुलभूत हक्कासाठी मात्र रस्त्यावर उतरावे लागणे ही शरमेची बाब आहे, असे म्हणत त्यांनी सरकारी यंत्रणेला धारेवर धरले. महिलांच्या पाठीवर हात ठेवत त्यांना आधार दिला.
गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र या सगळ्या लढ्यात डाँ. प्रणोती माई जगताप यांच्यातील समाजसेविका पुन्हा तालुक्याला दिसली. इतरही अनेक नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली असली तरीही, प्रणोती जगताप यांनी केलेली आस्थेवाईक चौकशी उपोषणकर्त्यांना भावली. आंदोलनानंतरही प्रणोती जगताप यांचीच तालुक्यात चर्चा होती.