ताज्या बातम्याडॉ.प्रा.राजेंद्र कुमार देवकाते उत्कृष्ट शारीरिक शिक्षण शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

डॉ.प्रा.राजेंद्र कुमार देवकाते उत्कृष्ट शारीरिक शिक्षण शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

spot_img
spot_img

फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्याकडून नवी दिल्ली येथे स्विकारला पुरस्कार..

श्रीगोंदा दि.27नोव्हेबर 2024

फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या कडून अहमदनगर क्रीडा विभागाचे सचिव प्रा.डॉ. राजेंद्रकुमार सुखदेव देवकाते यांच्या शारीरिक शिक्षण, योगा, व आरोग्य या विषयांमधील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दि .२४नोव्हेंबर २०२४ रोजी न्यू दिल्ली येथे उत्कृष्ट शारीरिक शिक्षण शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामजिक, शारीरिक,शैक्षणिक तथा क्रीडा, योगा आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असल्याने प्रा.डॉ.राजेंद्र कुमार देवकाते यांना केंद्रिय स्तरावर हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

प्रा.डॉ.राजेंद्रकुमार सुखदेव देवकाते यांनी शारीरिक शिक्षण, योगा, व आरोग्य या विषयांमध्ये अनेक संशोधन पेपर प्रसिध्द केलेले आहेत. त्यांनी अनेक पुस्तके ही लिहीली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी हे चांगल्या उच्च पदाच्या नोकऱ्यांवरती विराजमान आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील अनेक खेळाडू विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी राष्ट्रीय व ऑल इंडिया पातळीवरती उच्च कामगिरी केलेली आहे. आणि सलग दोन वर्ष झाले ते अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाचे अतिशय कर्तव्यनिष्ठ, जबाबदारपणे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शारीरिक शिक्षण विषयाबरोबरच योगशास्त्र विषयामध्ये सुद्धा रुची दाखवत योगशास्त्र विषयातील ज्ञान अवगत करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाला या ठिकाणी योगा कोच ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेले आहे. त्याचबरोबर एम ए योगशास्त्र हा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यांनी योगा मध्ये सुद्धा नेट परीक्षा ऊतीर्ण केलेली आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला नवी दिल्ली येथे फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी बहुमान दिला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे महात्मा फुले नूतन महविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. ए.बी चेडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व सर्व विद्यार्थी, श्री संत गजानन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. राजू देविदास म्हेत्रे, डॉ. कासले विठ्ठल, प्रा.श्रीकांत तनपुरे, संघर्षनामा मल्टिमीडियाचे मुख्यसंपादक, मेजर भिमराव उल्हारे, पत्रकार उज्वला उल्हारे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज़