महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचे करण्यात आले जल्लोषात स्वागत..
पारनेर दि.18 एप्रिल 2025
डॉ. सुजय विखे पाटील आज पारनेर दौऱ्यावर आले असता त्यांचे पारनेर शहरात भाजप माहितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार काशिनाथ दाते, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत गायकवाड, किरण कोकाटे, युवराज पठारे, मनोज मुंगसे, वसंत चेडे, अण्णा नरसाळे, प्रितेश पाणमल आदी उपस्थित होते.
नागेश्वर ग्रामीण पतसंस्था पारनेर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमादरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तसेच नागरिकांच्या समस्या व निवेदन स्वीकारून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.
तसेच पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजयराव औटी यांनी त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बैलगाड्या शर्यतीला देखील उपस्थित दर्शविली. डॉ. सुजय विखे पाटील यांनी बैलगाडा शर्यत पाहण्याचा आनंद घेतला. तसेच विजयराव औटी यांना जन्मदिवसाच्या आमदार काशिनाथ दाते यांच्यासमवेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच अंबिका माता यात्रा गोरेगाव व माजी सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाऊंडेशनतर्फे भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कुस्त्यांच्या जंगी मैदानात आयोजित कार्यक्रमाला देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थिती दर्शविली व कुस्ती लावून हा रंगतदार खेळ पाहण्याचा आनंद घेतला.
अनेक वर्षांपासून सदरील कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येत असून हा उत्सव परिसरातील लोक मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. मी देखील आज गोरेगावच्या यात्रेनिमित्त आपल्या सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने यात्रेसाठी शुभेच्छा देतो असे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले.