अहमदनगर बातम्याराजपूतवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदी 'यांची' निवड

राजपूतवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदी ‘यांची’ निवड

spot_img
spot_img

 

राजपूतवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय परदेशी तर, उपाध्यक्षपदी विनोद परदेशी यांची निवड.

कर्जत तालुक्यातील कोरेगांव केंद्र अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपूतवाडी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यासाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. शूरवीर महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून श्रीफळ वाढवून, मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांसह पालकांच्या अनुमतीने पालक मेळावा सुरू करण्यात आला. त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी विजय परदेशी तर, उपाध्यक्षपदी विनोद परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शिक्षणतज्ञ सदस्य म्हणून जितेंद्र परदेशी तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी सदस्य म्हणून कोरेगांव ग्रामपंचायत सदस्य जयवंत उर्फ दादासाहेब फाळके पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. सर्व पालकांच्या व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचितांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक श्री. तुषार जाधव सर, सहशिक्षक श्री. अमोल अस्वर सर व मोठ्या संख्येने पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज़