अहमदनगर बातम्यामा.आ.राहुल जगतापांच्या 'त्या' आश्वासनावर शेतकरी खूष, दिवाळी गोड होणार...

मा.आ.राहुल जगतापांच्या ‘त्या’ आश्वासनावर शेतकरी खूष, दिवाळी गोड होणार…

spot_img
spot_img

 

मा.आ.राहुल जगतापांचे श्रीगोंदेकरांना मोठे आश्वासन, म्हणाले…

 

आपल्या पारदर्शी कामाबाबत कुकडी साखर कारखाना जिल्ह्यात चर्चेत असतोच मात्र आता माजी आमदार राहुल जगतापांनी पुन्हा सभासदांना सुखद धक्का दिला आहे. कुकडी कारखान्याच्या सभेत दिवाळीपूर्वी दुसरा हप्ता देण्याचे आश्वासन देत राहुल जगतापांनी सभासदांच्या टाळ्या मिळवल्या.

 

पिंपळगाव पिसा येथील कारखान्यावर २६वी सर्वसाधारण सभा झाली. त्यात कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगतापांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय जाहिर केले. कारखान्याने एफआरपी एवढा भाव जाहिर केलाच आहे. आता आगामी हंगामात जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या स्पर्घेतला भाव देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय तालुक्यातील शेवटचे टिपरू गाळप होईपर्यंत कारखाना सुरु ठेवण्याचा निर्णयही जाहिर केला.

 

कारखाना कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे राहुल जगतापांनी दाखवून दिले. उसतोडणी कामगारांना १० कोटींची आगावू रक्कम दिली असल्याचे सांगून त्यांनी सर्व उस उत्पादकांना दिलासा दिला. घनश्याम शेलार, बंडू जगताप, जयसिंग गावडे, बाजीराव घालमे यांसह शेतकरी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज़