निवडणुकीमधून डॉ. राजेंद्र विखे यांची माघार
शिर्डी दि.12जून 2024
नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली. त्यात विवेक कोल्हे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. दरम्यान मंत्री विखे पाटील यांच्या बंधूंनी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर यात खरी रंगत आली होती.
विखे कोल्हे लढत पुन्हा रंगणार अशा चर्चा मात्र सुरु झाल्या होत्या. दरम्यान आता या निवडणुकीमधून डॉ. राजेंद्र विखे यांच्यासह मुख्याध्यापक संघटनेचे भाजपचे कार्यकर्ते प्राचार्य सुनील पंडित, किशोर प्रभाकर दराडे आदींसह १५ उमेदवारांनी माघार घेतली. निवडणुकीच्या रिंगणात विवेक कोल्हे, भाऊसाहेब कचरे, अमृतराव शिंदे आदींसह नगरचे नऊ जण असल्याची माहिती समजली आहे.
या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी काही उमेदवारांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याने निवडणुकीतून माघार घेतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता फडणवीस काही आगामी राजकीय प्लॅनिंग करत आहेत का अशी चर्चाही रंगली आहे.
राजकीय पक्षांनी या निवडणुकीत महिलांना उमेदवारी दिल्याचे दिसले नाही. शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, समता पार्टी, जनक्रांती पार्टीसह सहा राजकीय पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उतरले परंतु महिलांचा समावेश दिसला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांनी देखिल या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
विखेंचे विरोधक विवेक कोल्हे मात्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोल्हे यांना आता कोण मदत करणार, याकडे नेत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी विखेंची यंत्रणा काय करणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. परंतु जर फडणवीस हे कोल्हे यांना मदत करतील का ? अशा चर्चा सुरु आहेत. तसे झाले तर कोल्हेंच्या विजयाच्या शक्यता उंचावल्या जातील अशीही चर्चा आहे.
या निवडणुकीत किशोर भिकाजी दराडे, अॅड. संदीप गुळवे, दिलीप पाटील, अॅड. मधुकर भावसार, किशोर प्रभाकर दराडे, भागवत गायकवाड, अनिल तेजा, अमृतराव उर्फ आप्पासाहेब शिंदे, अविनाश माळी, इरफान मो इसहाक, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागर कोल्हे, संदिप कोल्हे, गजानन गव्हारे, बाबासाहेब गांगर्डे,
संदिप वामनराव गुळवे, संदिप नामदेव गुळवे, कुंडलिक जायभाय, सचिन झगडे, दत्तात्रय पानसरे, दिलीप डोंगरे, धनराज विसपुते, निशांत रंधे, पै. डॉ. छगन पानसरे, सुनील पंडित, रणजित बोठे, भास्कर भामरे, महेश शिरुडे, रखमाजी भड, रतन चावला, डॉ. राजेंद्र विखे, आर. डी. निकम, रुपेश दराडे, मुखतार शेख, संदिप गुळवे असे ३६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. दि. १२ जून रोजी १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे.