Sunday, December 22, 2024

“उद्या” माजी आमदार राहुल जगताप भरणार उमेदवारी अर्ज

आता माघार नाही,लढणार पण आणि जिंकणार पण असा एकच नारा

श्रीगोंदा दि.28 ऑक्टोबर 2024

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील युवकांचे प्रेरणास्थान व जनसामान्यांचा आवाज माजी आमदार राहुल जगताप हे मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीचे दावेदार असताना महाविकास आघाडी कडून ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली. त्यामुळे माजी आमदार राहुल दादा जगताप हे अपक्ष उमेदवारी करणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन जगताप परिवाराकडून करण्यात आले आहे.

 

गेल्या पाच वर्षात मा.राहुल जगताप यांनी मतदारसंघात लोकाभिमुख प्रगतशील आणि दूरदृष्टी पूर्ण विकास कामे केली आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, खादी ग्रामोद्योग, सोसायट्या अशा महत्त्वाच्या क्षेत्रा वरील त्यांनी आपली पकड सैल होऊ दिली नाही. सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यांनी पाच वर्षात दिलेली शब्द पूर्ण केले. जनसामान्यांसाठी झगडणारा स्वाभिमानाने लोकांसाठी लढणार असा त्यांचा लौकिक आहे. मतदार संघाचा कायापालट करण्याच्या ध्येयाने विकासाचे व्हिजन ठेवत त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेचा अपार विश्वास  आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या राहुल जगताप यांच्याकडे पुन्हा एकदा आमदार म्हणून पाहिले जाते.

माजी आमदार राहुल जगताप हे उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे आपल्या लाडक्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघातील सर्व स्वाभिमानी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जगताप यांच्याकडून करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या