ताज्या बातम्याश्रीगोंद्यात जिलेटीनचा स्फोट ; तिघांच्या चिंधड्या ,एक अत्यवस्थ

श्रीगोंद्यात जिलेटीनचा स्फोट ; तिघांच्या चिंधड्या ,एक अत्यवस्थ

spot_img
spot_img

सहजासहजी सापडतंय जिलेटीन, श्रीगोंद्यातील पोलिस यंत्रणा करतेय काय?

श्रीगोंदा, ता. १५-जून २०२४

विहिरीच्या कामासाठी जिलेटीनच्या कांड्याचा स्फोट घडवून आणण्याच्या नादात एक धक्कादायक घटना घडली आहे. पेरलेल्या कांड्यांचा अचानक स्फोट होऊन विहिरीत काम करणाऱ्या तिन कामगारांच्या चिंधड्या झाल्या असून एकजण अंत्यवस्थ असल्याचे समजते. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत हा स्फोट झाला असून आज दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते.

 

या गावात विहिरीचे काम सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. विहिरीच्या कामासाठी जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करुन स्फोट घडवून आणण्याचे नियोजन असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र विहिरीत काम करणारे कामगार विहिरीच्या बाहेर येण्यापूर्वीच जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाला. त्यावेळी विहिरीत चार कामगार असल्याचे समजते. या चौघांपैकी तिघांच्या जागीच चिंधड्या उडाल्या तर एक अंत्यवस्थ आहे. इतर दोघेही जखमी झाल्याचे समजते. याबाबत श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधला असता पोस्टमार्टम सुरु असल्याचे समजते.

 

जिलेटीनच्या कांड्या येतात कोठून ?

जिलेटिनच्या कांड्या स्फोटक म्हणून वापरल्या जातात मात्र त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मात्र श्रीगोंदा तालुक्यात सर्रास जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करण्यात येत असल्याचे समजते. जिलेटीनच्या कांड्या विध्वंसक असतात. त्या वापरासाठी पर्यावरण विभाग, भुजल विभाग तसेच इतर अनेक परवानग्यांची आवश्यकता असते. मात्र श्रीगोंदा तालुक्यात त्या अगदी सहज उपलब्ध होतात.

 

मोठा मासा सापडणार का?

जिलेटीनचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला. एक अंत्यवस्थ आहे. मात्र या गंभीर प्रकारात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कांड्या आल्या कोठून, त्यासाठी परवानगी घेतली होती का, जिलेटीन वापरणारे कामगार प्रशिक्षित होते का, सगळ्या परवानग्या मिळवल्या होत्या का, असे अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहे. या स्फोटानंतर श्रीगोंद्यापर्यंत जिलेटीन सर्रास येते व ते पुरविणारे मोठे मासे परिसरात आहेत, या चर्चा मात्र सुरु झाल्या आहेत.

 

काळीज पिळवटविणारी रडारड

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय व पोलिस स्टेशन परिसरात मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. सगळीकडे आक्रोश ऐकायला मिळत आहे. मात्र या आक्रोशाला कारणीभूत असणारे मोठे मासे पोलिसांच्या जाळ्यात अडकतील का, हा प्रश्न आहे. अंबानींच्या अँटालिया या बंगल्याजवळ गेल्यावर्षी जिलेटीनच्या २० कांड्या सापडल्या होत्या. त्यावेळी देशभरातले गृहखाते कामाला लागले होते. आता या तीन मृत्यूनंतर गृहखाते श्रीगोंद्यातही कसून तपास करेल का, हे पहावे लागेल.

लेटेस्ट न्यूज़