महाराष्ट्रशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी... कुकडी ओव्हर फ्लो चे पाणी वळविले इतर तलाव भरण्यासाठी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी… कुकडी ओव्हर फ्लो चे पाणी वळविले इतर तलाव भरण्यासाठी

spot_img
spot_img

कुकडी प्रकल्पातील चारही धरणे ओव्हर फ्लो

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – कुकडी व घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे, यावर्षी कुकडी प्रकल्पाचे चारही धरणांच्या ओव्हरफ्लोचे पाणी नदीद्वारे विसर्ग चालू आहे. या विसर्गामधुन कुकडीच्या कॅनल द्वारे श्रीगोंदा तालुक्यातील तलावामध्ये पाणी सोडण्या संदर्भात आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब यांनी मागणी केली होती.

       कुकडीचे अभियंता श्री हेमंत धुमाळ साहेब यांच्यासोबत फोन द्वारे संभाषण झाले आहे. याला प्रतिसाद देत दिनांक १-१०-२०२३ पासून कुकडी डावा कालव्याद्वारे श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर आणि इतर तलावामध्ये पाणी सोडले आहे. संदर्भात कालवा सुरू करण्यात आला आहे, असे आदरणीय पाचपुते साहेब यांनी माहिती दिली.तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या भागातील तलाव भरून घ्यावेत अशी विनंती पाचपुते यांनी केली.

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज़