गौरी शुगर सारखा इतर कारखान्यांनीही अपेक्षित दर द्यावा. श्रीगोंदा दि.22 नोव्हेंबर 2023
तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर साखर कारखान्याने उसाला पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन ३ हजार ६ रुपयांचा दर दिला आहे. आता जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने किती दर देणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
श्रीगोंदा तालुक्यात २० ते २५ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पन्न निघते. चालू गळीत हंगामात कुकडी साखर कारखान्याने प्रतिटन २६०० तर नागवडे कारखान्याने २५०० रुपये प्रतिटन न पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच गौरी शुगर या खासगी साखर कारखान्याने पहिला हप्ता
३००६ रुपये दिल्याने परिसरातील ऊस. उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तुलनात्मक भाव आणि यंदा फायनल पेमेंट किती मिळेल यावर चर्चा रंगली आहे… दरम्यान, इतर साखर कारखान्यांनीही उसाला चांगला दर द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
गौरी शुगरची कुणाशीही स्पर्धा नाही. मी शेतकरी कुटुंबातील आहे. मला शेतकऱ्यांच्या वेदना माहीत आहेत. आम्ही शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसाचे योग्य दाम वेळेवर देणे आणि दिलेली शब्दपूर्ती कशी करता येईल तसेच कुणाची फसवणूक होणार नाही, याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत असल्याचे कारखान्याचे प्रमुख बाबूराव बोत्रे यांनी सांगितले. यावेळी गणेश डोईफोडे, सचिन चौधरी उपस्थित होते.