दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एवढे भेटणार अनुदान
अहमदनगर दि.4 जानेवारी 2024
राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघाना गायीच्या दूधाचा पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याना प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नागपूर अधिवेशनात मंत्री विखे पाटील यांनी पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता.मात्र सहकारी दूध संघाप्रमाणेच खासगी दूध संघाना दूध देणार्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळावा आशी मागणी करण्यात आली येत होती.
आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सहकारी दूध संस्था प्रमाणेच खासगी दूध संघानाही या निर्णयाचा लाभ देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.या निर्णयाची अंमलबजावणी दि.११जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ पर्यत करण्यात येणार असून,सदर योजनेच्या अंमलबजावणी करीता बॅके मार्फत विशेष साॅफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादकांच्या बॅक खात्यावर डिबीटी द्वारे देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सहकारी व खासगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकरी ३.५फॅट आणि ८.५एसएनएफ या गुणप्रति करीता किमान २७ रुपये प्रतिलिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहीत पध्दतीने जमा करणे बंधनकारक राहील.त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगून फॅट व एसएनएफ ३.५/८.५ या गुणप्रतिपेक्षा प्रति पाॅईन्ट कमी होणार्या फॅट व एसएनएफ करीता प्रत्येकी ३०पैसे वजावट करण्यात येईल किंवा प्रति पाॅईन्ट वाढिकरीता ३० पैसे वाढ करण्याची तरदूत योजनेच्या अंमलबजावणीत आहे.
राज्यात माहे नोव्हेंबर २०२३ मधील प्राप्त आकडेवारी नूसार सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिदिन १४९लाख लिटर दूधाचे संकलन होत आहे.प्रसातावित पाच रुपये अनुदानाप्रमाणे एक महीन्याच्या कालावधी करीता अंदाजित २३० कोटी रूपये इतके अनुदान आवश्यक राहील.मात्र प्रत्यक्ष होणार्या दुध संकलनातील घट अथवा वाढ यानूसार उपरोक्त रकमेत बदल होईल असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.