Friday, December 20, 2024

माजी महापौर संदीपदादा कोतकर यांची शहरात ग्रँड एन्ट्री…

चौकाचौकात फटाके फोडून समर्थकांनी केला जल्लोष : स्वागताने कोतकर भारावले

केडगाव :दि 24 ऑक्टोबर 2024

तब्बल १२ वर्षांच्या अवधी नंतर माजी महापौर संदिप कोतकर यांचे केडगावमध्ये आज आगमन झाले .कोतकर समर्थक व केडगावकरांनी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले .

कोतकर यांच्या केडगाव मधील आगमनाची मोठी उत्सुकता होती .त्यांच्या स्वागताची त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली होती .आज दुपारी केडगाव हद्दीत कोतकर यांचे आगमन होताच ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून व घोषणाबाजी करीत जल्लोष केला .कोतकर यांच्या स्वागतासाठी नगर – पुणे मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दि केली होती . महिलांनी प्रत्येक चौकात त्यांचे औक्षण केले .केडगावकरांच्या स्वागताने संदिप कोतकर भारावुन गेले . अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली . त्यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला . तसेच केडगावमधील ग्रामदैवतांचेही दर्शन घेतले .केडगावच्या रेणुकामाता मंदिरात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली . यावेळी कोतकर समर्थक मोठया संख्येने उपस्थीत होते .

आणखी महत्वाच्या बातम्या