खरवंडी कासार येथील राष्ट्रीय महामार्गाच्या खराब रस्त्यासाठी 16 कोटी रुपये निधी मंजूर: खा.विखे
पाथर्डी दि.8 डिसेंबर 2023
पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६१ (जुना२२२) वरील खरवंडी कासार ते अहमदनगर १०.६५ किमी या खराब रस्त्याच्या लांबीसाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
राष्ट्रीय महामार्ग ६१ येथील अहमदनगर ते खरवंडी कासार रस्त्याचे मजबुतीकरण करणे यामध्ये २३२.१५० ते २५५.२८० अहमदनगर ते खरवंडी कासार या भागातील राष्ट्रीय महामार्ग ६१ (जुना२२२) वरील रस्त्याची मजबूती करण्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाली आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ (जुना२२२) वरील मेहकरी ते फुंटेटाकळी येथील ५२ किलो मीटर लांबीच्या टप्प्यातील रस्त्याचे कामापैकी ५२ किमीच्या रस्त्यापैकी १०.६५ किमी रस्त्याचे काम खराब झाले होते. दरम्यान या कामासाठी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी १६ कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत.
सदर कामासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे देखील खासदार सुजय विखेंनी स्पष्ट केले.