काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
श्रीरामपूर दि.26 ऑक्टोबर 2024
काही दिवसांपूर्वी काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात २३ उमेदवारांचा समावेश आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काही जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. यानंतर आज ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच ज्या जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही त्या जागांवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसऱ्या यादीत नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापले असून तेथे हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची आज ऑनलाईन बैठक पार पडणार आहे. जागावाटपात कठोर भूमिका न घेतल्याने मित्रपक्षांना जास्त जागा सोडाव्या लागल्याने काल राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज पुन्हा होत असलेल्या बैठकीला महत्त्व आले आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.
राजेश तुकाराम मानवतकर – भुसावळ (राखीव)डॉ. स्वाती संदीप वाकेकर – जळगाव (जामोद)महेश गांगणे – अकोटशेखर प्रमोदबाबू शेंडे – वर्धा अनुजा सुनील केदार – सावनेर गिरीश कृष्णराव पांडव – नागपूर दक्षिण सुरेश यादवराव भोयर – कामठी पूजा गणेश थावकर – भंडारा (राखीव) दलीप वामन बनसोड – अर्जुनी – मोरगाव (राखीव) राजकुमार लोटुजी पुरम – आमगाव (राखीव) प्रो. वसंत चिंडूजी पुरके – राळेगाव अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर – यवतमाळ जितेंद्र शिवाजीराव मोघे – आर्णी (राखीव)साहेबराव दत्तराव कांबळे – उमरखेड (राखीव)कैलास किसनराव गोरंट्याल – जालनामधुकर कृष्णराव देशमुख – औरंगाबाद पूर्वविजय गोविंद पाटील – वसई काळू बधेलिया – कांदीवली पूर्वयशवंत जयप्रकाश सिंह – चारकोपगणेश कुमार यादव – सायन कोळीवाडाहेमंग ओगले – श्रीरामपूर (राखीव)अभयकुमार सतीशराव साळुंखे – निलंगा गणपतराव आप्पासाहेब पाटील – शिरोळ