सुरेगाव सोसायटीच्या सदस्यांना लाभांश वाटप…
विसापूर दि.10 नोव्हेंबर 2023
जिल्हा सहकारी बँकेच्या विविध कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहेत.वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास त्या फायदेशीर ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी.आमदार राहुल जगताप यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव-घुटेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभादांना तेरा टक्के लाभांश जगताप यांच्या हस्ते गुरुवार दि. ९ रोजी वाटप करण्यात आला.आनंदाश्रम स्वामींच्या मठात वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी ते पुढे बोलताना जगताप म्हणाले की, शेतकरी सभासदांनी सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज घेऊन वेळेत परतफेड केल्यास त्यांना शुन्य टक्के दराने पिक कर्ज वापरता येते. अशावेळी सेवा संस्थाही,सक्षमपणे काम करुन सभासदांना लाभांश वाटप करु शकते.
सुरेगाव सोसायटी जिरायत भागातील संस्था असूनही सक्षम असल्याबद्दल त्यांनी गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक भगवान घुटे होते. तालुका विकास अधिकारी पोपटराव व्यवहारे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष संभाजी घुटे, संस्थेचे अध्यक्ष विजय दारकुंडे, डॉ. अनिल मोरे, गुलाब रामफळे, संतोष लोखंडे, निलेश उदार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कुकडीकारखान्याचे माजी संचालक अंकुशराव रोडे, जिल्हा बँकेचे गोपाळराव पवार, विसापूरचे शाखाधिकारी चंद्रकांत सरडे,पोपटराव रोडे, सुभाष वाळके, दत्तात्रय दारकुंडे, राजेंद्र रोडे,संतोष शिंदे, भगवान रोडे, ईश्वर लहाकर, गोवर्धन रोडे, सरपंचगोविंद घुटे, संदीप घुटे, नितीन शिंदे, बाबुशेठ राक्षे, गजाननपवार, गणेश रोडे, सुखदेव रोडे, रविंद्र रामफळे, संस्थेचे सचिवसंतोष वागस्कर, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.