Friday, December 20, 2024

कर्जत तालुक्यात राष्ट्रवादीला पुन्हा एकदा दे धक्का..

आ. प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धटेक मधील 9 सदस्यांचा निर्णय

कर्जत दि.2 डिसेंबर 2023

सिद्धटेक ता कर्जत ग्रा पं .मधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात

गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात आमदार रोहित पवारांना रोज नवनवीन राजकीय धक्के बसताना दिसत आहेत.अश्यातच आता सिद्धटेकमध्येही मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सिद्धटेक ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांनी राष्ट्रवादीच्या उपसरपंचाविरोधातील अविश्वास ठराव बहूमताने मंजूर ( ९ विरुद्ध १ ) झाला आहे. यामुळे सिद्धटेक ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली आहे. सिद्धटेकमधील 9 सदस्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कर्जत तालुक्यात मोठे भगदाड पडले आहे.

कर्जत तालुक्यातील सर्वात महत्वपूर्ण असलेल्या सिद्धटेक ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता होती. येथील सरपंचपद रिक्त असल्याने राष्ट्रवादी समर्थक अमोल भोसले हे उपसरपंच म्हणून गावचा कारभार पाहत होते. उपसरपंच भोसले यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सिद्धटेकमधील 9 सदस्यांनी बंड पुकारत अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठरावासाठी गावातील पारंपारिक विरोधक (भाजप व राष्ट्रवादीचे सदस्य) पहिल्यांदाच एकत्र आले. या सर्वांनी एकत्रित येत उपसरपंच अमोल भोसले यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताने जिंकत राष्ट्रवादीच्या सत्तेला मोठा सुरूंग लावला.

सिद्धटेक हे महाराष्ट्रातील महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. सिध्दटेकचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही,हीच गोष्ट हेरून सिद्धटेक ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांनी आज 1 डिसेंबर 2023 रोजी आमदार प्रा.राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सर्व सदस्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या विकासाभिमूख नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रमेश विठ्ठल पवार, सौ लता सोमनाथ सांगळे, वामनराव मोरे,सखाराम महादेव तांदळे, सौ शोभाबाई नागनाथ जाधव, सौ रेश्मा अमित खोमणे, सौ उज्वला मच्छिंद्र बनकर, अभिजीत मांढरे हे ग्रामपंचायत सदस्य तसेच सारंग रोहिदास नलगे, चिंतामण सांगळे, सचिन बनकर, बंडा (भाऊ) मोरे, तुकाराम लष्कर उपस्थित होते. या सर्वांचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी स्वागत केले. ग्रामपंचायतमध्ये विकासाचे राजकारण करा. सिद्धटेकच्या विकासासाठी सर्व विकास कामे मार्गी लावू असा शब्द यावेळी त्यांनी दिला.

सिद्धटेक ग्रामपंचायतचे सरपंचपद रिक्त असल्याने रोहित पवार समर्थक अमोल भोसले हे उपसरपंच म्हणून गावचा कारभार काम पाहत होते. सिद्धटेक ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी पारंपारिक विरोधकांचे पुन्हा एकदा मनोमिलन केले. त्यांना राष्ट्रवादीच्या सदस्याने साथ दिली. यामुळे उपसरपंचाविरोधातील अविश्वास ठराव बहुमताने मंजुर झाला. या राजकीय घडामोडीमुळे सिद्धटेक ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूंग लागला. सिद्धटेक ग्रामपंचायत आता भाजपच्या ताब्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या