ताज्या बातम्यालोकसभा निवडणुकीत जनतेचे पाठबळ मोदींच्या पाठीशी: पालकमंत्री विखे

लोकसभा निवडणुकीत जनतेचे पाठबळ मोदींच्या पाठीशी: पालकमंत्री विखे

spot_img
spot_img

पुणेवाडीत विकास कामांचा शुभारंभ, श्री काळभैरवनाथ देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश

पारनेर दि.2 डिसेंबर 2023

आघाड्यांचा खेळ फार काळ टिकत नाही त्यामुळे देशात कितीही पक्ष एकत्रित आले तरी येणार्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठबळ देईल असा विश्वास महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तालुकयातील पुणेवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी रस्त्याच्या सुमारे २कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ ३३ /११के.व्ही.विद्युत केंद्राचे लोकार्पण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात याप्रसंगी विश्वनाथ कोरडे काशिनाथ दाते सिताराम खिलारी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे सौ.आश्विनी थोरात सरपंच बाळासाहेब रेपाळ उपसरपंच सुहास पुजारी उपस्थित होते.

याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्र सरकार कडून मिळत असलेल्या निधीतून ग्रामीण भागाच्या विकासाचे नवे चित्र समोर येत आहे.संपूर्ण देश आज बदलत आहे.अन्य देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांवर आली असल्याकडे लक्ष वेधून मोदीजीच्या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक माणसाला मिळत असल्याचे सांगितले.

कोव्हिड संकटात संपूर्ण जग थांबले होते.तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यानी देशातील ८०कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू केली.या योजनेला २०२९ पर्यत मुदतवाढ दिली असल्याचे स्पष्ट करून असंघटीत कामगारांना जेवण आणि इतर योजनांमधून त्यांचे अधिकार त्यांना केंद्र सरकारने दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती आपल्याला वाढवावी लागणार असून गायरान जमीनीची उपलब्धता असेल आणि तशी मागणी आल्यास घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.पुणेवाडीचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानाच क वर्गात समावेश करण्याचे जाहीर करतानाच अतिवृष्टीमध्ये नूकसान झालेल्या ४४हजार शेतकऱ्यांना ४०कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून राहीलेल्या शेतकऱ्यांना ७कोटी रूपये तातडीने देण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

लेटेस्ट न्यूज़