Thursday, December 19, 2024

हिवाळी अधिवेशनात आ. राम शिंदे यांना तालुक्यातील विकासासाठी 46.50 कोटींचा निधी मंजूर

काहीजण श्रेयासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार :शेखर खरमरे

कर्जत दि.8 डिसेंबर 2023

डिंसेबर २०२३ हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पात मा. प्रा. राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील रस्ते विकासासाठी ४६. ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांत कार्यकर्त्यांकडून विविध रस्त्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. आणि त्या मागण्या पूर्ण करण्याबाबत तसा शब्द शिंदे यांनी दिला होता. त्या सर्व मागण्या अगदी कमी कालावधीत पुर्ण करून दिलेल्या शब्द पुर्ण करण्याचे काम प्रा राम शिंदे यांनी केले आहे. गावपातळीवर सामान्य लोकांच्या दळणवळणासी निगडित असणाऱ्या प्रश्नांची जाण प्रा. शिंदे यांना होती म्हणून पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद त्यांनी केली. राज्य पातळीवर काम करताना महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास निधी उपलब्ध केला आणि मतदारसंघात सुक्ष्म लक्ष केंद्रित केले.

काल निधीची घोषणा झाल्यानंतर विविध गावच्या स्थानिक ग्रा पं .पदाधिकाऱ्यानी प्रसिद्धी माध्यमात आपण या कामांसाठी आमदार प्रा . राम शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केल्याचा संदर्भ देत महायुती सरकार आणि आमदार प्रा राम शिंदे साहेबांच्या आभार मानले आहेत.

मात्र काही लोकांकडून एका बाजूला महायुती सरकारच्या नावाने शिमगा केला जातो आहे आणि प्रा. राम शिंदे यांनी आणलेल्या निधीच्या श्रेयाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी केली जाते आहे. तर आजोबांच्या माडींवरून काकाला बान मारायचे, आणि विकासनिधीचे श्रेय घेण्यासाठी काकाचे फोटो टाकत जनतेला मूर्ख बनवायचे? हा राजकारणातील घृणास्पद प्रकार काही लोक करत असल्याचे आरोप भाजपा तालुका अध्यक्ष शेखर खरमरे यांनी नाव न घेता रोहित पवार यांच्या वर केली आहे. राजकीय पातळीवर अनेक राजकारणी पाहीले पण श्रेयासाठी ईतकी लोळण घेणारे पाहिले नाही. पण जनता हुशार आहे कोणी कितीही श्रेय वाद केला तरी सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती आहेत याची जाणीव जनतेला असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष शेखर खरमरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. . . .

आणखी महत्वाच्या बातम्या