“शासकीय आय.टी.आय. राहुरी येथे संविधान मंदिर उद्घाटन
समारंभ”राहुरी :-दि 18 सप्टेंबर 2024
शासकीय आय .टी .आय .राहुरी येथे 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ११ वाजता माजी नगराध्यक्षा सौ. उषाताई प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते व राहुरी नायब तहसीलदार सौ. संध्या दळवी व तांदूळवाडी ग्रामपंचायत चे सरपंच गणपत पेरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवर , ग्रामस्थ , पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत”संविधान मंदिराचे” उद्घाटन करण्यात आले.
त्याच बरोबर राज्यातील 434 शासकीय आय .टी .आय. मध्ये भारताचे उपराष्ट्रपती माननीय श्री. जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन समारंभ पार पडला .
यावेळी माननीय सौ .उषाताई तनपुरे यांनी भारतातील सर्व नागरिकांनी संविधानाचे पालन करावे व संविधानाचा अभ्यास करून आपल्याला जे अधिकार प्राप्त करून देण्यात आले आहे त्याचा अभ्यास करावा व नंतरच न्याय , अधिकार व कर्तव्य पार पाडावेत असे सांगितले तसेच राहुरी चे नायब तहसीलदार सौ.संध्या दळवी यांनी संविधानाचे पालन करून त्याचा आदर करावा व भारताप्रती आपली देशभक्ती जागृत ठेवावी असे विद्यार्थ्यांना आव्हान केले . सदरील कार्यक्रमासाठी उपस्थित माजी प्राचार्य श्री. चंद्रकांत भोसले साहेब यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून सांगितले.
संस्थेचे प्राचार्य श्री. मुकुंद महामुनी साहेब यांनी प्रास्ताविक करून सर्व मान्यवरांचा सत्कार केला. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील गटनिदेशक श्री . श्रीहरी वैद्य सर, सौ. दुसाने मॅडम , चौधरी सर , भालेराव सर , मोरे सर , गागरे सर , आर .बी. विटनोर सर , आर .एन. विटनोर सर , धनवटे सर व सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले यावेळी श्री.चौधरी सर यांनी निबंध स्पर्धा , रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले . श्री संभाजी मोरे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्री.भालेराव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.